जामीन फेटाळल्याने बोगस डॉक्टराने पत्करली शरणागती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 08:52 PM2018-09-25T20:52:44+5:302018-09-25T20:53:10+5:30
रुग्णांकडून कमी फी घेवून व्यवसाय थाटल्याने त्याच्या दवाखान्यात रुग्णांची सतत गर्दी झालेली असायची. पर्वरी भागात वास्तव्य करुन रहात असलेल्या बिरादर याच्या निवासस्थानी सुद्धा पोलिसांनी छापा घातला होता. त्यात तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्याच्या कुटुंबियांनी दिशाभूल करणारा पत्ता पोलिसांना दिला होता.
म्हापसा - मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर म्हापसा येथे बोगस डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस करणारे हनुमंतराय बिरादर यांना म्हापसा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना शरण आल्यानंतर त्याला ही अटक करण्यात आली.
आंगोड-म्हापसा परिसरात त्यांनी स्वत:चा दवाखाना थाटला होता. त्याच ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची तो तपासणी करीत होता. वैद्यकीय शिक्षणाचे कोणतेही दाखले नसताना तसेच योग्य प्राधिकारणीकडून योग्य प्रमाणपत्र नसताना बिरादर हा बेकायदेशीरपणे अॅलोपॅथी डॉक्टर म्हणून तपासणी करीत होता. या संबंधीची तक्रार गोवा वैद्यकीय काऊन्सिलने तसेच निबंधक गोविंद नास्नोडकर यांनी म्हापसा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीनुसार त्याला अटक करण्यात आली. १२ मार्च रोजी ही तक्रार नोंद करण्यात आली होती. तसेच गोवा वैद्यकीय काऊन्सिलचे माजी अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांनी सुद्धा जानेवारी महिन्यात त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. भा. दं. वि. कलम ४६५, ४६८, ४७१ आणि कलम ४२० तसेच २००५ च्या गोवा मेडिकल काऊंन्सिल कायद्याच्या कलम २७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले होता.
त्यानंतर तो सततपणे पोलिसांना गुंगारा देवून फिरत होता. त्याला अटक करण्यासाठी त्याच्या दवाखान्यावर पोलिसांनी छापा सुद्धा घातला होता. त्यात पोलिसांनी काही बनावट प्रमाणपत्रे जप्त केली होती. या प्रकरणी मेडिकल काऊन्सिल आॅफ इंडियाच्या बनावट प्रमाणपत्राचा सुद्धा समावेश होता. यापूर्वी जून महिन्यात म्हापशातील अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. रुग्णांकडून कमी फी घेवून व्यवसाय थाटल्याने त्याच्या दवाखान्यात रुग्णांची सतत गर्दी झालेली असायची. पर्वरी भागात वास्तव्य करुन रहात असलेल्या बिरादर याच्या निवासस्थानी सुद्धा पोलिसांनी छापा घातला होता. त्यात तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्याच्या कुटुंबियांनी दिशाभूल करणारा पत्ता पोलिसांना दिला होता.