महापालिका जनसंपर्क अधिकाऱ्याची पीएचडी पदवी बोगस; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 05:38 PM2021-08-05T17:38:02+5:302021-08-05T17:38:37+5:30

Bogus PhD Degree : आयुक्तांनी नावापुढे डॉक्टर न लावण्याचा काढला आदेश

Bogus PhD degree of municipal public relations officer; Both arrested | महापालिका जनसंपर्क अधिकाऱ्याची पीएचडी पदवी बोगस; दोघांना अटक

महापालिका जनसंपर्क अधिकाऱ्याची पीएचडी पदवी बोगस; दोघांना अटक

Next
ठळक मुद्देउल्हासनगर महापालिकेत उपयुक्तांच्या बनावट सहीने नोकरीचे नियुक्तीपत्र दिल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल होऊन अटक झाली.

सदानंद नाईक

उल्हासनगर : महापालिका जनसंपर्क अधिकाऱ्याची पीएचडी पदवी बोगस असल्याचे आदेश आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी काढल्याने, एकच खळबळ उडाली. नावापुढे डॉक्टर लावण्याचे यापूर्वीचे आदेश रद्द केल्याचे आयुक्तांनी महापालिका विभाग प्रमुखांना व सामान्य प्रशासन विभागाला लेखी कळविले आहे.

उल्हासनगर महापालिकेत उपयुक्तांच्या बनावट सहीने नोकरीचे नियुक्तीपत्र दिल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल होऊन अटक झाली. पोलीस चौकशीत मोठे घबाळ निघण्याची शक्यता आहे. या दरम्यान महापालिका जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी महापालिकेत पीएचडी पदवीचे प्रमाणपत्र जमा केल्यानंतर, सन २०१७ साली तत्कालीन आयुक्तांनी भदाणे यांच्या नावापुढे डॉक्टर लावण्याचे आदेश काढले. मात्र तेव्हापासून पीएचडी पदवी बोगस असल्याची चर्चा शहरात रंगून कारवाईची मागणी वेळोवेळी झाली. अखेर राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांची पीएचडी पदवी अवैध असल्याची माहिती महापालिकेला दिली. त्यानुसार आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी पीएचडी पदवी अवैध असल्याचे आदेश काढले.

महापालिका आयुक्तांनी पीएचडी पदवी बोगस असल्याचे आदेश काढून यापुढे भदाणे यांच्या नावापुढे डॉक्टर लावू नये, असे महापालिका विभागाना व युवराज भदाणे यांना लेखी कळविले. दरम्यान भदाणे यांनी बोगस पीएचडी पदवी प्रमाणपत्र महापालिकेला देऊन महापालिकेची फसवणूक केल्याचा आरोप समाजसेवक दिलीप मालवणकर यांनी केला. याप्रकरणी महापालिका भदाणे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल का करीत नाही? असा प्रश्न त्यांनी केला. गुन्हा दाखल करीत नसल्याच्या निषेधार्थ ९ ऑगस्ट पासून मुंबई आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याचा पवित्रा समाजसेवक दिलीप मालवणकर व रामेश्वर गवई यांनी घेतला. तसेच गुरवारी आनंद हॉटेल येथे पत्रकार परिषद घेऊन भदाणे यांच्यावर आरोप केले.


भदाणे यांचा होणार भांडाफोड?
 महापालिका जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्यावर विविध आरोप असून काही प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत. त्यांच्या शाळा सोडण्याच्या दोन वेगवेगळ्या दाखल्यावर दोन जन्म तारीख असल्याने, खरी कोणती? असा प्रश्न पडला. महापालिकेला नोकरीच्या वेळी सन १९७२ जन्म तारखेचा शाळा सोडण्याचा दाखला जोडण्यात आला. तर आरकेटी महाविद्यालय यांनी सन १९७० चा जन्म तारखेचा शाळा सोडल्याचा दाखला दिला. असे महापालिकेला लेखी कळविले आहे. एकूणच भदाणे यांचा भांडाफोड होणार का? अशा चर्चेला ऊत आला आहे.

Web Title: Bogus PhD degree of municipal public relations officer; Both arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.