बायकोवर फेकले उकळते दूध; नवऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 19:45 IST2019-05-27T19:40:44+5:302019-05-27T19:45:04+5:30
पोलिसांनी नवऱ्यावर चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

बायकोवर फेकले उकळते दूध; नवऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल
नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील गाळा नगर परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय बायकोवर तिच्याच पतीने उकळते दूध फेकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यात बायको गंभीरपणे भाजल्याने उपचारासाठी रुग्णालयात भर्ती केले होते. बरी झाल्यावर बायकोने तुळींज पोलीस ठाण्यात दुःखद कहाणी सांगून तक्रार दिल्यावर पोलिसांनी नवऱ्यावर चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पूर्वेकडील गाळानगर परिसरातील साईराम चाळीत राहणाऱ्या रिना संदीप पांडे (27) यांचे संदीप आनंद पांडे (30) याच्यासोबत सप्टेंबर 2010 मध्ये लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून नवरा रिनाला हुंड्यासाठी तगादा लावला होता. नवीन रिक्षा घेण्यासाठी 50 हजार रुपये घरून आण व नवीन रूम घेण्यासाठी दीड लाख रुपये आणण्यासाठी संदीपने तगादा लावला होता. रिनाने नकार दिल्यावर मारहाण करून शिविगाळ करत होता. यानंतर सासू, सासरा, नवरा आणि नणंद रिनाची शारीरिक व मानसिक छळवणूक करण्यास सुरुवात केली. 3 एप्रिलला रात्री 11च्या सुमारास नवरा संदीप पांडे, सासरा आनंद पांडे, सासू कविता पांडे आणि नणंद छाया यांनी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेले उकळते दूध रिनाच्या अंगावर टाकल्याने गंभीर भाजली होती. आणि आवाज केला तर गॅसवर बसून पेटवून देईल अशी धमकी देत डॉक्टरकडे उपचाराला न नेता घरामध्ये कोंडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. नंतर रिनाने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन बरे झाल्यानंतर गुरुवारी रात्री तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे.