6 बायका फजिती ऐका! सातव्यांदा चढणार होता बोहल्यावर, तितक्य़ात मंडपात आले पोलीस अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 11:36 AM2023-02-03T11:36:24+5:302023-02-03T11:44:46+5:30

अस्लम असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. ज्याने आतापर्यंत 6 वेळा लग्न करून महिलांची फसवणूक केली आहे. 

bokaro police arrested aslam who had married 6 times and bid to marry for 7th time in ranchi | 6 बायका फजिती ऐका! सातव्यांदा चढणार होता बोहल्यावर, तितक्य़ात मंडपात आले पोलीस अन्...

फोटो - आजतक

googlenewsNext

झारखंडची राजधानी रांचीमध्ये पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे ज्याने आपली ओळख आणि धर्म लपवून तब्बल 6 लग्न केले होते आणि आता सातवे लग्न करण्याच्या तयारीत होता. अस्लम असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. ज्याने आतापर्यंत 6 वेळा लग्न करून महिलांची फसवणूक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अस्लम हा 50 वर्षीय आरोपी धनबादमधील भूलीचा रहिवासी आहे. तो पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून मुलींना आपल्या जाळ्यात अडकवायचा. अस्लम सातव्यांदा लग्न करण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच दरम्यान त्याची खरी ओळख आणि धर्म कळला. स्वत:ला संजय म्हणवणारा अस्लम घटनास्थळावरून फरार झाला होता. 

शहराचे डीएसपी कुलदीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस बराच काळ त्याचा शोध घेत होते. त्यानंतर पोलिसांनी अस्लमला रांची येथून अटक केली. त्याच्यावर अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिच्याशी शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच आदिवासी अल्पवयीन व अल्पसंख्याकांना धमकावून धर्म लपवून 6 वेळा विवाह केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अस्लम लग्नासाठी मुलींसमोर स्वतःला पोलीस अधिकारी म्हणवून घेत असे. त्याच्या अटकेनंतर शहर डीएसपी कुलदीप कुमार म्हणाले की, अस्लमविरुद्ध रांची, धनबाद, तोपचांची आणि चासमध्ये अनेक खटले प्रलंबित आहेत. त्याचा गुन्हेगारी इतिहास असून तो 2021 मध्ये एका प्रकरणात तुरुंगातही गेला होता. रिपोर्टनुसार, आरोपी अस्लम पैशाचं आमिष दाखवून मुलींशी लग्न करायचा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: bokaro police arrested aslam who had married 6 times and bid to marry for 7th time in ranchi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.