रेव्ह पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेता कपिल झवेरी याला सशर्त जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 06:45 PM2020-08-25T18:45:29+5:302020-08-25T18:46:45+5:30
सहा महिने हणजुणला फिरकण्यास बंदी
पणजी : हणजुण येथील गाजलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणी अटक झालेल्या बॉलिवूड अभिनेता कपिल झवेरी याला पणजी सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. ५० हजार रुपये व तत्सम रकमेच्या वैयक्तिक हमीवर त्याला हा जामीन मंजूर करण्यात आला. हणजुण येथे त्याचा बंगला असून पुढील सहा महिने हणजुणला जाण्यास त्याला मनाई करण्यात आली आहे.
पंधरा दिवस चौकशीसाठी क्राइम ब्रॅंचमध्ये हजर राहावे, तपासकामात आवश्यक ते सहकार्य करावे, पासपोर्ट जमा करावा तसेच सहा महिने हणजुणला जाऊ नये, अशा अटी त्याला जामीन करताना मंजूर करताना घालण्यात आल्या आहेत.
कपिल झवेरी याच्या हणजुण येथील 'फिरंगी व्हिल्ला' नामक बंगल्यात स्वातंत्र्यदिनाच्या उत्तर रात्री ही पार्टी झाली होती. क्राईम ब्रँच पोलीस अधिकाऱ्यांनी या पार्टीवर धाड घालून २३ जणांना अटक केली होती. यात तीन विदेशी महिलांचाही समावेश होता. गोव्याबाहेरील धेंडेच या पार्टीत सहभागी झाली होती. एकूण नऊ लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. या पार्टीचे बॉलीवूड कनेक्शनही नंतर उघडकीस आले होते तसेच इव्हेंट ऑर्गनायझर, सनबर्न पार्टीचे प्रमोटर शैलेश शेट्टी यालाही अटक झाली होती. शैलेश याला तीन दिवसांपूर्वी जामीन मंजूर झालेला आहे. या प्रकरणात पुढील तपास चालू आहे. कपिल याच्यावतीने न्यायालयात अॅड. कमलाकांत पोवळेकर व अॅड. अनुप कुडतरकर यांनी काम पाहिले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?