ना मास्क, ना डिस्टन्सिंग; सचिनची मुलगी सारा तेंडुलकरसह बॉलिवूड अभिनेत्रींची कॉन्सर्टला हजेरी, आयोजकांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 02:02 PM2021-12-13T14:02:36+5:302021-12-13T14:20:02+5:30
Grand hyatt party in mumbai, action against organizers : या कॉन्सर्ट कार्यक्रमात अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. सोशल डिस्टन्सिंगबाबत विचाराल तर त्याचा फज्जा उडाला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना आता देशासह जगात ओमायक्रोन हायपाय पसरत असताना मुंबईमध्ये सध्या जमावबंदी म्हणजेच कलम १४४ लागू केले आहे.
मुंबईतील प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये कोरोनाच्या नियमांना हरताळ फासून कॅनेडियन रॅपर एबी ढिल्लोनच्या गाण्यावर तरुणाई थिरकली. त्यात बॉलिवूडची स्टार मंडळींचा सहभाग होता. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ग्रँड हयात हॉटेलमधील या कॉन्सर्टमध्ये अभिनेत्री सारा अली खान, तिचा भाऊ इब्राहिम अली खान, जान्हवी कपूर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही दिग्गज मंडळी देखील हजर होती. कॅमेऱ्यात ही नामांकित मंडळी कैद झाली आहेत.
या कॉन्सर्ट कार्यक्रमात अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. सोशल डिस्टन्सिंगबाबत विचाराल तर त्याचा फज्जा उडाला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना आता देशासह जगात ओमायक्रोन हायपाय पसरत असताना मुंबईमध्ये सध्या जमावबंदी म्हणजेच कलम १४४ लागू केले आहे.
कोरोना नियमांना हरताळ फासून ग्रँड हयातमधील कॉन्सर्टमध्ये पार्टीत अभिनेत्री सारा अली खान, जान्हवी कपूर, सारा तेंडुलकरसह या नामांकित मंडळींनी लावली हजेरी, आयोजकांवर कारवाईचा बडगा pic.twitter.com/HRbOoXu3l8
— Lokmat (@lokmat) December 13, 2021
कलम १४४ लागू असताना कालीना येथील ग्रँड हयातमध्ये कार्यक्रमाला परवानगी कशी मिळाली हा मोठा प्रश्न उपस्थित राहत आहे. या कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवल्याचं चित्र दिसून येत आहे. सोशल डिस्टन्स नाही, मास्क नाही. कॅनेडियन रॅपर धील्लोनचा लाईव्ह कॉन्सर्टचा कार्यक्रम रविवारी येथे आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याप्रकरणी या कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई करण्यात आली आहे.
कोरोना नियमांना हरताळ फासून ग्रँड हयातमधील कॉन्सर्टमध्ये पार्टीत अभिनेत्री सारा अली खान, जान्हवी कपूर, सारा तेंडुलकरसह या नामांकित मंडळींनी लावली हजेरी, आयोजकांवर कारवाईचा बडगा pic.twitter.com/CzV7m7xs6Q
— Lokmat (@lokmat) December 13, 2021