बोगस ड्रायव्हिंग लायसन्स दहा हजार रुपयांना विकणारी गॅंग अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 01:45 PM2018-12-24T13:45:32+5:302018-12-24T13:46:24+5:30

आरोपींनी पाचशे ते सहाशे लोकांना बोगस  ड्रायव्हिंग लायसन्सची विक्री केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांनी सांगितले. आरोपींंकडून पोलिसांनी २० पेक्षा अधिक बोगस  ड्रायव्हिंग लायसन्स, एक संगणक, सीपीयु, स्कॅनर मशिन, प्रिंटर आणि इतर दस्तावेज हस्तगत केले आहेत.

Bonga Driving License Attempted to sell gang for Rs 10,000 | बोगस ड्रायव्हिंग लायसन्स दहा हजार रुपयांना विकणारी गॅंग अटकेत 

बोगस ड्रायव्हिंग लायसन्स दहा हजार रुपयांना विकणारी गॅंग अटकेत 

Next
ठळक मुद्दे ताहीर हुसैन सरदार हुसैन शेख आणि सायना सैद खान या दोघांना पोलिसांनी अटक केली दहा हजार रुपयात ही गॅंग बनावट  ड्रायव्हिंग लायसन्स देत असल्याचे तपासात पुढे आले या दोघांनी आतापर्यंत पाचशे ते सहाशे बोगस ड्रायव्हिंग लायसन्स विक्री केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली

मुंबई - शहरात वाहनांच्या चोरीबरोबरच बनावट वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) देणाऱ्या गँगचा सुळसुळाट झाला आहे. अशाच एका गँगचा गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक 9 च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ताहीर हुसैन सरदार हुसैन शेख आणि सायना सैद खान या दोघांना पोलिसांनीअटक केली असून त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहे. न्यायालयाने या दोघानांही 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  दहा हजार रुपयात ही गॅंग बनावट  ड्रायव्हिंग लायसन्स देत असल्याचे तपासात पुढे आले आहे. या आरोपींनी पाचशे ते सहाशे लोकांना बोगस ड्रायव्हिंग लायसन्सची विक्री केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांनी सांगितले. आरोपींंकडून पोलिसांनी २० पेक्षा अधिक बोगस  ड्रायव्हिंग लायसन्स, एक संगणक, सीपीयु, स्कॅनर मशिन, प्रिंटर आणि इतर दस्तावेज हस्तगत केले आहेत.

मुंबई शहरात बोगस ड्रायव्हिंग लायसन्स बनविणारी गॅंग कार्यरत असून हुबेहुबे दिसणारे  ड्रायव्हिंग लायसन्स बनवून त्याची गरजू लोकांना दहा हजार रुपयांना विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक ९च्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या गॅंगमधील दोन म्होरके खार परिसरात येणार असल्याची गुप्त  माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आशा कोरके, सुधीर जाधव, विजय अंबावडे, विकास सावंत, पेडणेकर आदी पथकांनी खार परिसरात आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. त्यावेळी तिथे बोगस ड्रायव्हिंग लायसन्स विक्रीसाठी आलेल्या ताहीर खान आणि सायना खान या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत ते दोघेही ट्रॉम्बे येथील चिता कॅम्प परिसरातील रहिवाशी असून ताहीर हा त्याच्या घरातच बोगस   ड्रायव्हिंग लायसन्स तयार करुन सायना हिला देत होता. त्यानंतर सायना ही गरजू लोकांना एक परवाना दहा हजार रुपयांना विकत होती. या दोघांनी आतापर्यंत पाचशे ते सहाशे बोगस ड्रायव्हिंग लायसन्स विक्री केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या गुन्ह्यात अन्य काही जणांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Bonga Driving License Attempted to sell gang for Rs 10,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.