लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी 4 गुन्ह्यांतील आरोपींना शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 02:51 PM2019-03-08T14:51:01+5:302019-03-08T14:59:52+5:30

आज जागतिक महिला दिनी पीडित अल्पवयीन मुलींच्या गुन्ह्यातील गुन्ह्यात फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Both accused were sentenced to death in pocso and murder case | लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी 4 गुन्ह्यांतील आरोपींना शिक्षा

लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी 4 गुन्ह्यांतील आरोपींना शिक्षा

Next
ठळक मुद्दे विशेष म्हणजे आज जागतिक महिला दिन असून या न्यायालयात महिला न्यायाधीश आणि सरकारी वकील देखील महिला होत्या. ठाणे कासारवडवली पोलीस हद्दीमध्ये 2013 साली एका 8 वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण आणि हत्या करणाऱ्या राम किशन आरोपीला ठाणे जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांनी चारही गुन्ह्यात आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. 

ठाणे - आज ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात अवघ्या 15 ते 20 मिनिटे चाललेल्या निकालच्या सुनावणीत चार गुन्ह्यांतील आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. विशेष म्हणजे आज जागतिक महिला दिन असून या न्यायालयात महिला न्यायाधीश आणि सरकारी वकील देखील महिला होत्या. ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांनी चारही गुन्ह्यात आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. 

भिवंडी भोईवाडा 2018 साली घडलेल्या गुन्ह्यामध्ये साडेचार वर्षाच्या लहान मुलीची लैंगिक शोषण आणि हत्या करणाऱ्या आरोपी मोहम्मद आबिद मोहम्मद अजमेर शेखला फाशीची शिक्षा सुनावली. ठाणे कासारवडवली पोलीस हद्दीमध्ये 2013 साली एका 8 वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण आणि हत्या करणाऱ्या राम किशन आरोपीला ठाणे जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.

ठाणे कापूरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2018 साली एका अल्पवयीन मुलीची लैंगिक शोषण करणाऱ्या सुमन नंदकुमार झा या आरोपीला देखील मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा दिली. तसेच मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2017 साली 8 वर्षाच्या मुलाची लैंगिक शोषण आणि हत्या करणाऱ्या आरोपी मोहम्मद हफिज शकील पठाणला देखील ठाणे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि 21 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

Web Title: Both accused were sentenced to death in pocso and murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.