मुलं होत नाही म्हणून दोघींनी केलं चिमुकलीचे अपहरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 05:01 PM2019-04-13T17:01:39+5:302019-04-13T17:05:06+5:30

या दोघींकडून अपहरण झालेल्या मुलीची सुटका करुन तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. 

Both kidnapped Kidnapped children because they did not have children | मुलं होत नाही म्हणून दोघींनी केलं चिमुकलीचे अपहरण 

मुलं होत नाही म्हणून दोघींनी केलं चिमुकलीचे अपहरण 

Next
ठळक मुद्देमीरा सुनिल काळे आणि मीना धर्मा चव्हाण अशी या दोन आरोपी महिलांची नावं आहेत.यावेळी कोर्टाने त्यांना 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई - तीन वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाच्या गुन्ह्यात दोन महिलांना निर्मल नगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने शिताफीने अटक केली. मीरा सुनिल काळे आणि मीना धर्मा चव्हाण अशी या दोन आरोपी महिलांची नावं आहेत. या दोघींकडून अपहरण झालेल्या मुलीची सुटका करुन तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. 

आरोपी महिला मीनाला मूल होत नसल्याने तिच्या वहिनीने तिला ही मुलगी दिल्याचे तपासात उघडकीस आलं आहे. अटकेनंतर या दोघींनाही वांद्रे येथील न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शहनाज रेहमान शेख ही महिला वांद्रे येथील जुने वांद्रे टर्मिनस, पाईपलाईन झोपडपट्टीत राहते. ती भीक मागण्याचे काम करते. तिला फातिमा नावाची एक तीन वर्षांची मुलगी आहे. 30 मार्चला फातिमा ही घरासमोर खेळत असताना ती अचानक गायब झाली. तिचा तिच्या आईसह स्थानिक रहिवाशांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे शहनाजने निर्मल नगर पोलीस ठाण्यात फातिमा हरवल्याबाबत तक्रार केली होती. याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता. नंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने या मुलीचा शोध सुरु केला. यावेळी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले होते. वांद्रे रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यानंतर ही मुलगी चर्चगेट लोकलमध्ये चढल्याची दिसून आली होती. त्यानंतर प्रत्येक रेल्वे स्थानकातील फुटेज पाहिल्यानंतर ती चर्चगेट रेल्वे स्थानकात एका महिलेसोबत दिसली. ही शोधमोहीम सुरु असतानाच मंत्रालयाजवळील बेस्ट बसस्टॉप फुटपाथवर राहणार्‍या मीरा काळे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिने या मुलीचे अपहरण केल्याची कबुली दिली. मीनाला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्या तावडीतून फातिमाची सुखरुप सुटका केली. चौकशीत मीनाला लग्नानंतर मूल होत नव्हते, त्यामुळे एकट्या मुलीला पाहून मीराने तिला उचलून नेले आणि मीनाच्या स्वाधीन केले. चौकशीत आलेल्या या माहितीनंतर या दोघींविरुद्ध पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. याच गुन्ह्यात त्यांना वांद्रे येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Both kidnapped Kidnapped children because they did not have children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.