पोलीस अधिकाऱ्यासह दोघे लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 06:03 PM2018-12-06T18:03:34+5:302018-12-06T18:05:40+5:30
पहिला हप्त्याची रक्कम म्हणून १ लाख रुपये स्वीकारताना प्रकाश दर्जा (वय ३६) याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक करण्यात आली. या कटात सामील असलेल्या डोंबिवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील भाऊराव वाघ आणि खाजगी इसम महेश पाटीलला एसीबीने अटक केली आहे.
ठाणे - आरोपीविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी तक्रारदाराकडे १० लाख रुपयांची लाच मागितली. त्यातील पहिला हप्त्याची रक्कम म्हणून १ लाख रुपये स्वीकारताना प्रकाश दर्जा (वय ३६) याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून (एसीबी) रंगेहाथ अटक करण्यात आली. या कटात सामील असलेल्या डोंबिवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील भाऊराव वाघ आणि खाजगी इसम महेश पाटीलला एसीबीने अटक केली आहे.
प्रथमेश ज्वेलर्सचे मालक कोठारी यांच्या विरूध्द दाखल गुन्ह्यात तक्रारदार इसमास न अडकविण्यासाठी आणि तक्रारदार यांचे गोल्ड ज्वेलरी मेकिंगचे पेपर, गुमस्ता लायसन्स, रूमचे अग्रीमेंट वगैरे कागदपत्रे परत करण्यासाठी डोंबिवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ यांच्या संगनमताने खाजगी इसम महेश पाटीलने तक्रारदार व्यक्तीकडे १० लाख रुपयांची लाच मागितली. मात्र, तक्रारदार यांनी याबाबत ३ डिसेंबरला एसीबीला माहिती दिली. त्यानुसार काल दुपारी ४ वाजताच्या सुमारास एसीबीने सापळा रचला. १० लाख या ठरलेल्या लाचेच्या रक्कमेचा पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपये स्वीकारताना प्रकाश दर्जा या खाजगी व्यक्तीस एसीबीने रंगेहाथ अटक केली.