विनयभंगप्रकरणी दोघांना सक्तमजुरीची शिक्षा, अलिबाग येथील घटनेत न्यायालयाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 12:14 AM2020-11-03T00:14:46+5:302020-11-03T00:15:06+5:30
Alibag : अलिबाग शहरातील मांडवी मोहल्ला येथील रजिवान खानने १५ मे २०१७ रोजी अल्पवयीन मुलगी सकाळी क्लासला जात असताना तिचा पाठलाग करीत तिला तुङयाशी फ्रेंडशिप करायची आहे असे बोलून तिचा विनयभंग केला होता.
अलिबाग : शहरात शालेय मुलीचा पाठलाग करीत छेड काढून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला विशेष न्यायालयाने दोषी ठरवित दोन वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रु पपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत घरात घुसून महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास आणि ५ हजार रु पयाच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
अलिबाग शहरातील मांडवी मोहल्ला येथील रजिवान खानने १५ मे २०१७ रोजी अल्पवयीन मुलगी सकाळी क्लासला जात असताना तिचा पाठलाग करीत तिला तुङयाशी फ्रेंडशिप करायची आहे असे बोलून तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी सदर मुलीच्या आईने दिलेल्या तक्ररीनुसार अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दोषारोप पत्र विशेष न्यायालयात दाखल केल्यानंतर या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधिशएस एस शेख यांच्या न्यायालयात झाली. अतिरिक्त अभियोक्ता ॲड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी या प्रकरणात ५ साक्षीदार तपासले. या प्रकरण पिडीत मुलगी तसेच तिच्या भावाची साक्ष महत्वाची ठरली. पाटील यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरीत विशेष न्यायालयाने आरोपी रजिवान खान याला दोन वर्षे सक्त मजुरी आणि २० हजार रु पये दंडाची शिक्षा सुनावली. या दंडामधून 15 हजार रु पये पिडीत मुलीला देण्याचा आदेशही पारित केला.
तर दुसऱ्या घटनेत १ डिसेंबर २०१८ रोजी मौजे वरसोली येथे आरोपीने फिर्यादी त्यांच्या घरात एकटयाच झोपलेल्या असताना त्यांच्या एकटेपणाचा फायदा घेवनु विनयभंग केला. न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आलेले होते. न्यायालायात पुरावा सिध्द झाल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पीएसजी चाळकर यांनी आरोपीत रणजित अग्रावकर
रा. वरसोली, अलिबाग यास एक
वर्षे सश्रम कारावास व एकूण पाच
हजार रूपये दंडाची शिक्षा
सुनावली.