Homosexual Police: पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलमध्ये 'समलैंगिक संबंध', करत होते न्यूड व्हिडीओ कॉलिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 01:57 PM2022-06-23T13:57:18+5:302022-06-23T13:59:14+5:30
Rajasthan Police News: पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोघांवर आरोप आहे की, दोघेही एकमेकांसोबत सेक्स चॅटिंग आणि न्यूड व्हिडीओ कॉलिंग करत होते.
Rajasthan Police News: राजस्थान पोलिसातील एक पोलीस उपनिरीक्षक आणि एक कॉन्स्टेबलला त्यांच्या व्यवहारावरून विभागीय कारवाईच्या रूपात निलंबित करण्यात आलं आहे. पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोघांवर आरोप आहे की, दोघेही एकमेकांसोबत सेक्स चॅटिंग आणि न्यूड व्हिडीओ कॉलिंग करत होते.
त्यांनी सांगितलं की, या प्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा पोलीस उपनिरीक्षक आणि खींवसर पोलीस स्टेशन प्रमुख गोपाल कृष्णने सोमवारी नागौर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली की, डेगाना पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल प्रदीप चौधरी त्याला व्हिडीओ कॉल दरम्यान त्याच्या नग्न अवस्थेत बनवण्यात आलेल्या व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करत आहेत.
नागौर पोलीस अधीक्षक राममूर्ती जोशी यांनी सांगितलं की, 'आरोपी कॉन्स्टेबलने आधीच पोलीस उपनिरीक्षकाकडून 2.2 लाख रूपये घेतले होते आणि आता तो पाच लाख रूपये व लक्झरी कारची मागणी करत होता. पोलीस उपनिरीक्षकाने सोमवारी माझ्याकडे तक्रार केली. ज्यानंतर हे स्पष्ट झालं की, दोघेही अशाप्रकारच्या कृत्यात सहभागी होते.
पोलीस अधिक्षकांनी सांगितलं की, पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलला यामुळे निलंबित करण्यात आलं कारण त्यांचं आचरण नियमानुसार नव्हतं. यादरम्यान खींवसर पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी आरोपी कॉन्स्टेबल विरोधात खंडणी वसूलीची तक्रार दाखल करून अटक केली आहे. जोशींनी सांगितलं की, दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात विभागीय चौकशी सुरू केली गेली आहे.