वाहन चोरीतील मास्टरमाईंडसह दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 09:00 PM2018-09-11T21:00:25+5:302018-09-11T21:00:54+5:30
१७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावल्याचे गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले.
मुंबई - मुंबईसह उत्तर प्रदेशातील वाहन चोरीचा क्राईम ब्रँचच्या मालमत्ता कक्षाने पर्दाफाश केल्याने, त्यांच्या चौकशीतुन वाहन चोरीतील मास्टरमाईंसडसह दोघांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. अहमद बशीर अहमद शेख या मास्टरमाईंडसह मोहसीन अशरफ बलोच या दोघांना अटक केली असून त्यांना १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावल्याचे गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले.
मलामत्ता कक्षाने यापूर्वी हजरत अली फक्रुद्दीन खान आणि अयुबअली शेख उर्फ गुड्डु या दोघांना अटक केली होती. या दोघांच्या चौकशीत अहमद बशीर आणि मोहसीन बलोच या दोघांचे नाव समोर आले होते. त्यानुसार, पोलिसांनी याचा तपास करण्यास सुरुवात केली असता, यातील मोहसीन बलोच हा चिरी केलेली सिफ्ट कार घेऊन जोगेश्वरी येथे येणार असल्याची महिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावला होता. अशातच, मोहसीन बलोचला अटक करण्यात आली. तर अहमद बशीरने येथुन पलायन केले.
यादरम्यान, मोहसीन बलोचने अहमद बशीरसह वालीव पोलीस ठाणे, तसेच विरार पोलीस ठाणे अंतर्गत दरोडा टाकल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच बशीरची देखील पोलिसांना दिल्यानंतर त्याचा माग काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. त्यातच तो नागपाडा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावुन बशीर अहमदला अटक केली. यावेळी त्याच्याकडुन दोन वाहने, एक मोटर लॉरी तसेच १ कोटी ८१ लाखांचे दरोड्याची रक्कम जप्त करण्यात आल्याचे सांवत यांनी सांगितले. तसेच यादरम्यान हे सराईत गुन्हेगारानी मोटार लॉरीसह चोरलेले ३१ टन कॉपर हे गुजरात राज्यात १ कोटी ८१ लाखांना विकले होते. त्यानुसार, पोलिसांनी गुजरातमध्ये जाउन जप्त केलेल्या कॉपरसह १ कोटी, ८१ लाख रुपये जप्त केले असून, याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.