अल्पवयीन मुलीवर ब्लेडने मुलाने ब्लेडने सपासप वार करून केले जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 06:17 PM2021-05-28T18:17:30+5:302021-05-28T18:19:15+5:30
Attack on Minor Girl : उल्हासनगर गोल मैदान परिसरातील बाल उद्यानात गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान एका अल्पवयीन मुलीवर परिसरातील गर्दुल्या मुलाने ब्लेडने सपासप वार करून गंभीर जखमी केले.
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेच्या बाल उद्यानात एका अल्पवयीन मुलीवर गुरवारी रात्री साडे नऊच्या सुमारास नशेखोर मुलाने ब्लेडने हल्ला केला. रक्ताने माखलेल्या मुलीने नातेवाईकांना झालेला प्रकार सांगितल्यावर त्यांनी मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर गोल मैदान परिसरातील बाल उद्यानात गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान एका अल्पवयीन मुलीवर परिसरातील गर्दुल्या मुलाने ब्लेडने सपासप वार करून गंभीर जखमी केले. याप्रकाराने खळबळ उडाली असून मुलीने झालेला सर्वप्रकार नातेवाईकांना सांगितला. दरम्यान गर्दुल्ल्या मुलाने घटनास्थळावरून पळ काढला. रात्री साडे अकरा वाजता मुलीला उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले असून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मुलीला रात्रीच ठाणे येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले. तसेच हल्ला करणारा मुलगा अल्पवयीन असून त्याला अटक करून त्याची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात करण्यात आल्याचे समजते. हल्ला करणारा मुलगा मुलीच्या ओळखीचा असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त डी टी टेळे यांनी दिली.
सिद्धार्थ पिठानी ही NCBची ३५ वी अटक, डॅशिंग अधिकारी समीर वानखेडेंवर कौतुकाचा पाऊसhttps://t.co/ldBI1XaAWv
— Lokmat (@MiLOKMAT) May 28, 2021
शहरात गुन्ह्याच्या प्रमाणात वाढ झाली असून एका आठवढ्यात दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. खून करणारे अट्टल नशेखोर व गर्दुल्ले आहेत. गावठी दारू, अंमली पदार्थाची विक्री सर्रासपणे होत असल्याने, गुन्ह्यात वाढ होऊन कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. खून, हाणामारी, चोरी, वाहन चोरी, फसवणूक आदी गुन्ह्यात वाढ झाली. दीड वर्षां महापालिकेने गुन्हेगारीत वाढ झाल्याने, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगून एक प्रस्ताव मंजूर केला होता. मंजूर केलेला प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याचे एकच खळबळ उडून पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले होते. गुन्ह्याच्या बाबतीत उल्हासनगर पोलीस ठाणे अग्रक्रमी असल्याचा आरोप होत आहे.