पुण्यात मुलाची मैत्रीसाठी जबरदस्ती, बारावीतील मुलीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2022 09:24 AM2022-12-03T09:24:43+5:302022-12-03T09:26:11+5:30

याप्रकरणी या तरुणीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

boy forced for friendship, 12th class girl commits suicide in Pune | पुण्यात मुलाची मैत्रीसाठी जबरदस्ती, बारावीतील मुलीची आत्महत्या

पुण्यात मुलाची मैत्रीसाठी जबरदस्ती, बारावीतील मुलीची आत्महत्या

googlenewsNext

- किरण शिंदे

पुणे : मैत्री करण्यासाठी जबरदस्ती करत वेळोवेळी पाठलाग करून त्रास दिल्याने बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. 12 ऑक्टोबर रोजी विमानतळ परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी या तरुणीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, चंदन नगर येथील केंद्रीय महाविद्यालयात मयत तरुणी बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिच्याच वर्गात 17 वर्षीय आरोपी देखील शिक्षण घेत होता. दरम्यान या तरुणीच्या शाळेत जाण्या येण्याच्या रस्त्यावर आरोपी वेळोवेळी तिचा पाठलाग करत होता. सोबत मैत्री करावी यासाठी जबरदस्ती करून तो तिला त्रास देत होता. या सर्वाला कंटाळून या तरुणीने विमानतळ परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. 

सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र तपासा दरम्यान हा सर्व प्रकार उघडकीस आला. विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: boy forced for friendship, 12th class girl commits suicide in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.