मुलानेच केली आईची निर्घृण हत्या, व्हॉट्स अॅपवर शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 06:32 PM2018-09-26T18:32:29+5:302018-09-26T18:32:51+5:30

ग्रुपमधील काही लोकांनी याबाबत पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलीस महिलेच्या घरी गेले तेव्हा महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. विवेक पांचाल असे या क्रूर तरुणाचे नाव आहे.

The boy had murdered his mother, the video shared with the What's App | मुलानेच केली आईची निर्घृण हत्या, व्हॉट्स अॅपवर शेअर केला व्हिडीओ

मुलानेच केली आईची निर्घृण हत्या, व्हॉट्स अॅपवर शेअर केला व्हिडीओ

Next

उदयपूर - राजस्थानमधील उदयपूर येथे एका १८ वर्षीय तरुणाने आईचे मस्तक भिंतीला जोरदार आपटून निर्घृण हत्या केली आहे. उपकाराची जाण नसलेला निर्दयी मुलगा इतक्यावरच न थांबला  त्याने आईचा चेहरा जमिनीवर आपटून आपटून छिन्नविछिन्न करून टाकला होता. त्यानंतर त्याने या हत्येचा हृदयद्रावक असा भयंकर व्हिडीओ व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करून त्याने आईची हत्या केल्याचे सर्वांना सांगितले. ग्रुपमधील काही लोकांनी याबाबत पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलीस महिलेच्या घरी गेले तेव्हा महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. विवेक पांचाल असे या क्रूर तरुणाचे नाव आहे.

विवेकची आई एकटी उदयपूरला राहायची तर विवेकचे वडील कामानिमित्त जबलपूरला राहायचे. विवेक देखील वडिलांसोबत जबलपूरला राहायचा. रविवारी गणपती विसर्जनासाठी तो उदयपूरला आला होता. त्या रात्री त्याचे आईसोबत कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर त्याने रागाच्या भरात आईची निर्दयीपणे हत्या केली व रात्री साडे बाराच्या सुमारास त्याचा व्हिडीओ त्यांच्या पांचाळ समाजाच्या ग्रुपवर टाकला. त्याचबरोबर त्याने लवकरच मी देखील आत्महत्या करणार असून सोमवारी माझा मृतदेह जेमान पुलाच्या खाली सापडेल असा मेसेज पाठवला. सोमवारी सकाळी जेव्हा ग्रुपमधील लोकांनी विवेकचा मेसेज बघितला तेव्हा त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस विवेक पांचाळच्या घरी पोहोचले तर त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. या प्रकरणी पोलिसांनी विवेकविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The boy had murdered his mother, the video shared with the What's App

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.