धावत्या ट्रेनमध्ये प्रियकराचा तरुणीवर अत्याचार, ठाण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 02:13 AM2021-02-15T02:13:04+5:302021-02-15T02:13:24+5:30

Crime News : मूळचा उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील रहिवासी असलेला अभिनव सिंग (१९) आणि पीडित तरुणी हे शालेय जीवनापासूनच एकमेकांचे मित्र आहेत.

Boyfriend abuses young girl in running train, shocking incident in Thane | धावत्या ट्रेनमध्ये प्रियकराचा तरुणीवर अत्याचार, ठाण्यातील धक्कादायक घटना

धावत्या ट्रेनमध्ये प्रियकराचा तरुणीवर अत्याचार, ठाण्यातील धक्कादायक घटना

Next

ठाणे : लग्नाचे आमिष दाखवित गोरखपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर तिच्याच कथित प्रियकराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी ठाणे रेल्वेस्थानकात घडली. ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात याप्रकरणी शुक्रवारी तक्रार दाखल झाली असून या मुलाचा रेल्वे पोलीस आता शोध घेत आहेत.
मूळचा उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील रहिवासी असलेला अभिनव सिंग (१९) आणि पीडित तरुणी हे शालेय जीवनापासूनच एकमेकांचे मित्र आहेत. दहावीपर्यंत मालाडमध्ये शिक्षण घेतल्यानंतर तो पुन्हा गोरखपूरमध्ये गेला होता. आता आपण लग्न करू, असे आमिष त्याने तिला दाखविले होते. १० फेब्रुवारी रोजी पहाटेच त्याने गोरखपूरला जाण्यासाठी तिला लोकमान्य टिळक टर्मिनल येथे बोलविले. १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईनच्या दिवशी लग्नाची त्याने योजना आखली होती. त्याच्या सांगण्यानुसारच तिने तिच्या घरातून दोन लाखांची रोकडही बॅगेत आणली. ही ट्रेन ठाणे स्थानकात सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आली. तेव्हा ती ट्रेनमधील शौचालयात गेली. त्याचवेळी अभिनवदेखील तिच्या पाठोपाठ शौचालयात शिरला. तिथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तो बाहेर आला. तशाच अवस्थेमध्ये तिने अभिनवबरोबर मनमाडपर्यंत प्रवास सुरू ठेवला. मनमाडमध्ये तिकीट तपासणीसाने तिला हटकले, तेव्हा तिला अभिनवने कोणतीच मदत न करता बतावणी करीत तो तिथून निसटला. अखेर तिथूनच तिने आपल्या पालकांशी संपर्क साधून  प्रसंगाची माहिती दिली. पालकांनी दंड भरून तिला घरी आणले. नंतर तिने १२ फेब्रुवारी रोजी अभिनवविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार मुंबईतील मालाड पोलीस ठाण्यात दाखल केली.

Web Title: Boyfriend abuses young girl in running train, shocking incident in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.