बॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्डला म्हणाला - भाऊ अन् मित्रासोबत संबंध ठेव, नकार दिला तर केलं हे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 03:45 PM2021-10-04T15:45:34+5:302021-10-04T15:46:00+5:30

कथितपणे आरोपीने महिलेला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला होता आणि त्याने तिला दोन पुरूषांसोबत संबंध ठेवण्यास सांगितलं होतं.

Boyfriend assaulted his girlfriend after she refused to get intimate with his brother and friend in Punjab | बॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्डला म्हणाला - भाऊ अन् मित्रासोबत संबंध ठेव, नकार दिला तर केलं हे कृत्य

बॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्डला म्हणाला - भाऊ अन् मित्रासोबत संबंध ठेव, नकार दिला तर केलं हे कृत्य

googlenewsNext

पंजाबमध्ये एका व्यक्तीने त्याच्या प्रेयसीसोबत कथितपणे मारहाण केली. महिलेने आपल्या प्रियकराच्या भावासोबत आणि त्याच्या मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. ही घटना शनिवारी रात्री नयागांवमध्ये घडली. कथितपणे आरोपीने महिलेला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला होता आणि त्याने तिला दोन पुरूषांसोबत संबंध ठेवण्यास सांगितलं होतं.

मीडिया रिपोर्टनुसार, महिलेचा प्रियकर बेरोजगार आहे. तर पीडित महिला गुरूग्रामच्या एका खाजगी कंपनीत काम करते. तक्रारदार महिलेनुसार, शनिवारी ती तिच्या प्रियकरासोबत नयागांवमधील एक हॉटेलमध्ये गेली होती. यावेळी तिचा प्रियकर दारू पिऊन टल्ली झाला होता. हॉटेलमध्ये महिलेच्या प्रियकराने तिला बाहेर उभे असलेल्या आपल्या भावासोबत आणि मित्रासोबत संबंध ठेवण्यास सांगितलं. 

जेव्हा महिलेने या गोष्टीस नकार दिला तर आरोपीने कथितपणे तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यानंतर महिला बेशुद्ध झाली आणि आरोपी तिला हॉटेलच्या बाहेर सोडून घटनास्थळावरून फरार झाला. स्थानिक लोकांनी महिलेला रविवारी सकाळी जखमी अवस्थेत पाहिलं आणि तिला चंडीगढच्या सेक्टर १६ मधील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवून घेतला आणि आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करून तीन दिवसांच्या रिमांडवर पाठवण्यात आलं आहे.
 

Web Title: Boyfriend assaulted his girlfriend after she refused to get intimate with his brother and friend in Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.