प्रेयसीसोबत संभोग करताना प्रियकराचा मृत्यू, मुंबईतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 05:08 PM2022-05-24T17:08:26+5:302022-05-24T17:10:33+5:30
Death Mystry : प्रियकर आणि प्रेयसी लग्नाआधीच शारीरिक संबंध ठेवताना त्यांच्यासोबत एक दुःखद घटना घडली आहे.
मुंबई : मुंबईतील कुर्ल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकर-प्रेयसी यांच्या सूत जुळल्यानंतर ते पळून गेले. अथवा प्रेमभंग झाला आणि त्यातून आत्महत्या केल्याच्या अनेक घटना आजवर आपण पहिल्या, ऐकल्या असतील. मात्र, प्रियकर आणि प्रेयसी लग्नाआधीच शारीरिक संबंध ठेवताना त्यांच्यासोबत एक दुःखद घटना घडली आहे. संभोग करत असताना प्रियकराचा मृत्यू झाल्याची खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
प्रियकर आणि प्रेयसी संभोग करताना ही धक्कादायक घटना मुंबईतील कुर्ला परिसरातील एलबीएस रस्त्यावर जीएसके हॉटेलमध्ये घडली. प्रियकराचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी या घटनेबाबत पोलिसांना सांगितलं. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या घटनेप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तसेच वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा पोलीस करत आहेत. मृताच्या शरीरावर कोणत्याही खुणा किंवा जखमा आढळून आलेले नाहीत. मृताचे वय हे ६१ वर्ष आहे तर त्याच्या प्रेयसीचे वय हे ४० वर्ष आहे.
विधवेला चार नराधमांनी घेरले; मारहाण करून केला सामूहिक बलात्कार
जीएसके हॉटेलमध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीसोबत सोमवारी सकाळच्या सुमारास चेक इन केलं. हॉटेलमध्ये आल्यानंतर या दोघांनी लैंगिक संबंध ठेवले. मात्र, यावेळी त्यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला. लैंगिक संबंधादरम्यान, या पुरुषाला अस्वस्थ वाटू लागलं आणि संभोग करताना तो बेशुद्ध झाला. यावेळी प्रेयसी घाबरली आणि तिने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना याबाबत कळवलं. यानंतर या पुरुषाला सायन रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मृताची प्रेयसी ही वरळी कोळीवाड्यात राहणारी आहे. ती एका खासगी कंपनीत कामाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.