प्रेयसीवर चाकूहल्ला करत प्रियकराने संपविले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 06:35 AM2019-10-01T06:35:26+5:302019-10-01T06:36:07+5:30

दोघांच्या वयात सहा वर्षांचे अंतर असल्याने प्रेयसीच्या आईने लग्नाला नकार दिला.

A boyfriend ends his life | प्रेयसीवर चाकूहल्ला करत प्रियकराने संपविले आयुष्य

प्रेयसीवर चाकूहल्ला करत प्रियकराने संपविले आयुष्य

Next

मुंबई : दोघांच्या वयात सहा वर्षांचे अंतर असल्याने प्रेयसीच्या आईने लग्नाला नकार दिला. नेहमीच्या नकारघंटेला कंटाळून प्रेयसीवर चाकूने जीवघेणा हल्ला करत प्रियकराने दहाव्या मजल्यावरून उडी घेत आयुष्य संपविल्याची घटना मालाडच्या कुरार परिसरात घडली. यात मंगेश शांताराम राणे (२४) या तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर तरुणीची प्रकृती चिंताजनक असून, कुरार पोलीस अधिक तपास करत आहेत.

क्रांती (नावात बदल) ही अठरा वर्षांची तरुणी बारावीत शिकत आहे, तर आंबेडकरनगरमध्ये राहणारा मंगेश एका खासगी हाऊस किपिंग कंपनीत काम करत होता. दोघांच्या वयात सहा वर्षांचे अंतर असल्याने तिच्या आईचा लग्नाला विरोध होता. महिनाभरापूर्वी मंगेशने क्रांतीच्या आईकडे क्रांतीसोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. मात्र क्रांतीच्या आईकडून नकार मिळाल्याने आणि तो पुढे कायम असल्याने मंगेश कंटाळला होता, अशी प्राथमिक माहिती तपासातून समोर येत आहे. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तो क्रांतीला भेटण्यासाठी तिच्या त्रिवेणीनगरच्या जय आंबे सोसायटीतील इमारतीमध्ये दहाव्या मजल्यावरील तिच्या घरी गेला होता. तेव्हा तिची आई घरातच होती. पुन्हा लग्नावरून मंगेश आणि क्रांतीच्या आईमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणादरम्यान मंगेशने स्वयंपाक घरातील चाकू उचलून क्रांतीच्या पोटात तीनदा खुपसला व घराबाहेर जाऊन दरवाजा बंद केला. त्यानंतर त्याने स्वत:च्याही हाताची नस कापली आणि दहाव्या मजल्यावरून उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला.

शेजाऱ्यांनी क्रांती आणि मंगेशला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र मंगेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर क्रांतीवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती नाजूक आहे. या प्रकरणी कुरार पोलीस दोघांचे नातेवाईक तसेच शेजाऱ्यांकडे चौकशी करत आहेत.

Web Title: A boyfriend ends his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.