सासर सोडून प्रियकराच्या घरी पळून आली प्रेयसी, तिला घरात बंद करून पळाले तरूणाचे कुटुंबिय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 03:07 PM2022-03-19T15:07:16+5:302022-03-19T15:08:54+5:30

Uttar Pradesh Crime News : महिला सासर सोडून आपल्या मुलासाठी आल्याचं पाहून तरूणच्या कुटुंबियांनी तिला घरात बंद केलं आणि तेही पळून गेले.

Boyfriend family locked his girlfriend in house after 10 days of marriage in Uttar padesh | सासर सोडून प्रियकराच्या घरी पळून आली प्रेयसी, तिला घरात बंद करून पळाले तरूणाचे कुटुंबिय

सासर सोडून प्रियकराच्या घरी पळून आली प्रेयसी, तिला घरात बंद करून पळाले तरूणाचे कुटुंबिय

googlenewsNext

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh Crime News) देवरियातील खुकुंदू भागातून एक अजब प्रेम प्रकरण समोर आलं आहे. इथे एका विवाहित महिला सासर सोडून पळून आपल्या प्रियकराच्या घरी पोहोचली. महिला घर सोडून आपल्या मुलासाठी आल्याचं पाहून तरूणच्या कुटुंबियांनी तिला घरात बंद केलं आणि तेही पळून गेले. यानंतर महिलेने ११२ वर फोन करून पोलिसांकडे मदत मागितली. ज्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून महिलेली सोडवणूक केली.

महिलेने पोलिसांना सांगितलं की, तिने आणि या तिच्या प्रियकराने जुलै २०१९ मध्ये एका मंदिरात लग्न केलं होतं. पण त्यानंतर तरूणीच्या कुटुंबियांनी तिचं लग्न दुसऱ्या एका तरूणासोबत लावून दिलं होतं. तेच लग्नाच्या १० दिवसांनंतर तिचा प्रियकर तिला पळवून घेऊन गेला होता. त्यानंतर दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याच्या घरात राहत होते. यादरम्यान तरूणी गर्भवती झाली. मग तरूणाच्या कुटुंबियांनी तिच्यावर दबाव टाकत तिला गर्भपात करण्यास भाग पाडलं. 

महिलेनुसार, तिच्या प्रियकराने काही दिवसांपूर्वी तिच्या मोबाइल फोनमधील त्यांचे सर्व फोटो डिलीट केले आणि काही फोटो जाळले. यानंतर त्याने त्याचा मोबाइल नंबरही बदलला. अशाप्रकारे त्याने तिच्यासोबत पूर्णपणे संपर्क तोडला. तरूणी म्हणाली की, तिने तरूणासोबत संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला. पण जेव्हा संपर्क होऊ शकला नाही तेव्हा ती तरूणाच्या घरी आली.

खुखुंदू पोलीस स्टेशनचे अधिकारी नवीन चौधरी म्हणाले की, 'तरूणी आणि तरूणातील प्रेम संबंधाचं प्रकरण आहे. होळीनंतर २२ मार्चला दोन्हीकडील लोकांना बोलवण्यात आलं आहे. आशा आहे की, चर्चा करून हे प्रकरण निवळलं जाईल'.
 

Web Title: Boyfriend family locked his girlfriend in house after 10 days of marriage in Uttar padesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.