धक्कादायक! नव्या गर्लफ्रेन्डच्या मदतीने बॉयफ्रेन्डने केली जुन्या गर्लफ्रेन्डची हत्या, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 02:56 PM2021-06-07T14:56:28+5:302021-06-07T15:04:27+5:30

काही पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी राहिल नावाच्या तरूणाला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता त्याने शबीनाची हत्या केल्याचं कबूल केलं.

Boyfriend killed his old girlfriend with the help of new girlfriend | धक्कादायक! नव्या गर्लफ्रेन्डच्या मदतीने बॉयफ्रेन्डने केली जुन्या गर्लफ्रेन्डची हत्या, कारण...

धक्कादायक! नव्या गर्लफ्रेन्डच्या मदतीने बॉयफ्रेन्डने केली जुन्या गर्लफ्रेन्डची हत्या, कारण...

googlenewsNext

बिहारच्या किशनगंजमधून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणाने फिल्मी स्टाईलमध्ये एका तरूणीची हत्या केली आहे. येथील शबीना नावाची तरूणी अचानक गायब झाली होती. त्यामुळे कुटुंबीयांना पोलिसात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तिचा तपास सुरू केला. अशात ३१ मे रोजी पोलिसांना एका तरूणीचा मृतदेह अररिया बॉर्डरवर मिळाली. हा मृतदेह शबीना बेगमचा होता. 

या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आणि एक एसआयटी टीम नेमली तेव्हा काही धागेदोरे त्यांच्या हाती लागले. या पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी राहिल नावाच्या तरूणाला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता त्याने शबीनाची हत्या केल्याचं कबूल केलं. त्याने यावेळी पोलिसांना सांगितलं की, नव्या प्रेमाच्या नादात त्याने जुन्या प्रेमाची हत्या केली. (हे पण वाचा : धक्कादायक! सूड उगवण्यासाठी मोठ्या बहिणीने घडवून आणला सख्ख्या लहान बहिणींवर गॅंगरेप)

राहिल पंजाबच्या लुधियानामध्ये काम करत होता आणि अनेक वर्षांपासून त्याचं शबीनासोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. लॉकडाऊन दरम्यान तो गावी गेला तर तिथे तो नाजमीन नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. याची खबर शबीनाला लागली. त्यामुळे शबीना राहिलमागे लग्नाचा तगादा लावत होती. याने राहिल वैतागला होता. अशात त्याने तिचा काटा काढण्यासाठी एक प्लॅन केला. (हे पण वाचा : धक्कादायक! तीन लेकरांना सोडून भाच्यासोबत पळून गेली काकी; पकडले गेल्यावर झालं असं काही...)

राहिलने शबीनाला आपल्या मार्गातून दूर करण्यासाठी एक प्लॅन केला आणि या प्लॅनमध्ये त्याने नवीन गर्लफ्रेन्ड नाजमीनचाही सहभागी करून घेतलं. राहिलने शबीनाला घरापासून दूर अररिया बॉर्डरवर भेटायला बोलवलं. तो तिथे आपल्या नव्या गर्लफ्रेन्डसोबत शबीनाची वाट बघत होता. राहिल शबीनाला काहीतरी कारण देत मक्याच्या शेतात घेऊन गेला आणि त्याने तिच्यावर चाकूने वार करत तिची हत्या केली.
 

Web Title: Boyfriend killed his old girlfriend with the help of new girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.