बोंबला! गर्लफ्रेन्डला पळवून नेण्यासाठी आला होता तरूण, तिच्या आईलाही नेलं उचलून....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 01:00 PM2021-01-11T13:00:55+5:302021-01-11T13:02:05+5:30
आता मुलीच्या परिवारातील लोकांच्या तक्रारीवरून आरोपी चंदन आणि कार ड्रायव्हर रंजन कुमार यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे.
झारखंडची राजधानी रांचीमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक तरूण त्याच्या अल्पवयीन प्रेयसीला पळवून नेण्यासाठी आला होता. पण सोबतच त्याने प्रेयसीच्या आईलाही उचलून नेलं. पोलिसांनी त्याला अटक केली असून कारही जप्त केली आहे. आता मुलीच्या परिवारातील लोकांच्या तक्रारीवरून आरोपी चंदन आणि कार ड्रायव्हर रंजन कुमार यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे.
पोलिसांनी सांगितले की, तरूणी बिहारच्या नालंदा जिल्हयातील कतरी सराय पोलीस स्टेशन परिसरातील राहणारा आहे आणि तो पूर्ण प्लॅनिंग करून प्रेयसीला पळवून नेण्यासाठी आला होता. तो भाड्याची कार घेऊन प्रेयसीला नेण्यासाठी झारखंडची राजधानी रांचीच्या घुटिया गावात पोहोचला होता.
प्रेयसीच्या आईने उचलून नेलं
मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन प्रेयसीला कारमध्ये बसवून आरोपी पसारच होणार होता इतक्यात तिथे मुलीची आई आली आणि तिने मुलीला पळवून नेणाऱ्यांचा विरोध केला. त्यानंतर आरोपी चंदनने कार ड्रायव्हरच्या मदतीने प्रेयसीच्या आईला जबरदस्ती कारमध्ये बसवलं आणि दोघींना घेऊन तो पसार झाला.
आईला मधेच उतरून दिलं
मुलीच्या आईनुसार आरोपीने तिला आणि अल्पवयीन मुलीला गाडी बसवून बालसरिंग रिंग रोडकडे गेला. यानंतर बालसरिंग पोहोचल्यावर त्याने प्रेयसीच्या आईला कारमधून खाली उतरून दिलं आणि ते पुढे निघून गेले.
मुलीच्या कुटुंबियांनी याची माहिती लगेच पोलिसांना दिली आणि एसएसपीच्या आदेशावरून रिंग रोडवरील सीसीटीव्ह फुटेजमधून कारचा नंबर मिळवला. त्यानंतर ओरमांझी पोलिसांनी रिंग रोडवर कारचा शोध सुरू केला. काही वेळाने एका कारला अडवून झडती घेतली तर त्यात हे तरूण आणि त्याची प्रेयसी सापडली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं. मुलीला कुटुंबियांच्या ताब्यात दिलं आणि आता तरूणा विरोधात कारवाई केली जात आहे.