गर्लफ्रेन्डची निर्दयीपणे हत्या करून डेडबॉडीवर लिहिला मेसेज, फ्लॅटमध्ये अनेक दिवस ठेवला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 01:03 PM2021-07-29T13:03:45+5:302021-07-29T13:05:06+5:30
ग्रेटर पोलीस मॅनचेस्टरच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२१ च्या दुपारी एश्टन रोडवरील एका पत्त्यावर महिलेचा मृतदेह आढळून आला होता.
ब्रिटनच्या ग्रेट मॅनचेस्टरच्या ओल्डममध्ये एका व्यक्तीने त्याच्या गर्लफ्रेन्डची चाकूने हत्या केली. त्याने निर्दयीपणे गर्लफ्रेन्डची हत्या केल्यावर स्वत: तिच्या शरीरावर असा मेसेज लिहिला, जेणेकरून समजावं की, मारेकरी कोण आहे. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. गर्लफ्रेन्डच्या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
ग्रेटर पोलीस मॅनचेस्टरच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२१ च्या दुपारी एश्टन रोडवरील एका पत्त्यावर महिलेचा मृतदेह आढळून आला होता. महिलेचं नाव इमोजेने बोहाजुक होतं आणि ती २९ वर्षांची होती. ओल्डममधील डेनिअल ग्रांट स्मिथला तिच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. डेनिअलने आपल्या गर्लफ्रेन्डचा मृतदेह फ्लॅटमध्येच ती आठवडे ठेवला होता.
इमोजेन बोहाजुकच्या बॉयफ्रेन्ड डेनिअल ग्रांट स्मिथला मॅनचेस्टर क्राउन कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. तो आता कमीत कमी १७ वर्षे तुरूंगात राहणार. डेनिअलने फार निर्दयीपणे इमोजेनची हत्या केली होती. तिच्या शरीरावर त्याने चाकूने अनेक वार केले होते. त्यानंतरही त्याचं मन भरलं नव्हतं.
बोहाजुक २०२० पासून स्मिथसोबत एकाच फ्लॅटमध्ये राहत होती. फेब्रुवारीमध्ये तिने पोलिसात स्मिथ विरोधात तक्रार केली होती. स्मिथने तिला मारहाण केली होती. १५ फेब्रुवारीनंतर बोहाजुकला कुणीही बघितलं नव्हतं. एका मित्राने पोलिसांना सूचना दिली होती. तेव्हा पोलिसांना ४ मार्चला तिचा मृतदेह फ्लॅटमध्ये आढळून आला.
पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं की, मारेकऱ्याने चाकूने अनेक वार केल्याने तिचा मृत्यू झाला. बोहाजुकच्या गळ्यावर गळा दाबल्याचे निशाणही होते. हत्येनंतर स्मिथने बोहाजुकच्या डेबिट कार्डचा वापरही केला होता. त्यामुळे त्याच्यावर संशय आला होता.
या केसाचा तपास करणारे एंटी नायस्मिथ म्हणाले की, हत्येनंतर स्मिथने त्याच्या गर्लफ्रेन्डच्या मृतदेहावर एक मेसेज लिहिला होता. त्याने लिहिलं होतं की, 'तो मीच आहे'. यावरून हे लक्षात येतं की, पोलिसांना तो स्वत:च गुन्हा केल्याचं सांगत होता.