VIDEO : विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला, घरातील उठले तर त्याला पेटीत लपवलं आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 10:41 AM2022-12-12T10:41:37+5:302022-12-12T10:41:59+5:30

Uttar Pradesh : ही घटना खोड़िया खुर्द गावातील आहे. शुक्रवारी रात्री तरूण आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेला. पण त्याचं नशीब खराब होतं.

Boyfriend went to meet married lover hides in a box video goes viral in UP | VIDEO : विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला, घरातील उठले तर त्याला पेटीत लपवलं आणि मग....

VIDEO : विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला, घरातील उठले तर त्याला पेटीत लपवलं आणि मग....

Next

यूपीच्या (Uttar Pradesh) अलिगढ (Aligarh) जिल्ह्यात एका तरूणाला प्रेमाच्या नादात तुरूंगाची हवा खावी लागली. विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेलेल्या प्रियकराबाबत तिच्या घरातील लोकांना समजलं. ज्यानंतर महिलेने तिच्या प्रियकराला एका मोठ्या पेटीत लपवलं. घरातील लोकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना बोलवलं. जेव्हा पोलिसांनी पेटी उघडली तर आत तिचा प्रियकर लपून बसला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

ही घटना खोड़िया खुर्द गावातील आहे. शुक्रवारी रात्री तरूण आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेला. पण त्याचं नशीब खराब होतं. रात्री महिलेच्या सासरचे लोक झोपेतून जागे झाले. संशय आल्यावर घरातील लोकांनी महिलेला विचारलं तर तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. ज्यानंतर सासरच्या लोकांनी पोलिसांना बोलवलं. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी तरूणाला पेटीतून बाहेर काढलं. आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

जशी पोलिसांनी पेटी उघडली तेव्हा तरूण आत दबा धरून लपला होता. ज्यानंतर त्याला बघून घरातील लोक त्याच्यावर धावून गेले. पोलिसांनी त्याचा जीव वाचवला आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. पेटीतून प्रियकर सापडल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून या घटनेची चर्चा रंगली आहे. लोक म्हणाले की, घरातील लोकांना महिलेच्या अफेअरची सूचना मिळाली होती. ज्यामुळे लोक तिच्यावर नजर ठेवून होते.

Web Title: Boyfriend went to meet married lover hides in a box video goes viral in UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.