प्रियकराच्या मित्रांनी शरीसंबंधांसाठी आग्रह केला, नकार देताच तरुणीच्या पाठीत चाकू खुपसला, नंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 09:46 AM2021-06-15T09:46:01+5:302021-06-15T09:46:07+5:30
Crime News: पोलिसांनी एका तरुणीच्या हत्येच्या धक्कादायक घटनेचा उगलडा केला आहे.
लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमधून पोलिसांनी एका तरुणीच्या हत्येच्या धक्कादायक घटनेचा उगलडा केला आहे. आरोपींनी सुरुवातीला या तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने नकार देताच या नराधमांनी चाकूने भोसकून तिच्या शरीराची चाळण केली. (Crime News) अखेरीस जेव्हा चाकू तिच्या मणक्यामध्ये अडकला तेव्हा आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या प्रियकरासह ३ जणांना अटक केली आहे. (The boyfriend's friends insisted on having sex, but when he refused, he stabbed the girl in the back)
लखनौमधील सरोजिनीनगर परिसरातील पोलिसांनी एका तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला होता. यादरम्यान या तरुणीची ओळख स्कूटर इंडिया येथील रहिवाशाच्या रूपात पटली. ती मुळची सीतापूर येथील रहिवासी होती. कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांची मुलगी १२ जून रोदी संध्याकाळी बेपत्ता झाली होती. त्यावेळी तिचे वडील ड्युटीवर गेले होते, तर आई तिच्या गावी होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर तरुणी मोहम्मद कैफ नावाच्या तरुणासोबत फोनवर बोलत असे. तो तरुण सरोजिनीनगरमधील रहिवासी होती. गेल्या एक महिन्यापासून ही तरुणी त्याच्याशी बोलत होती. १२ जून रोजी तरुणीने मोहम्मद कैफला सांगितले की, तिचे वडील घरी नाहीत, तर आई गावात गेली आहे. हे समजल्यावर कैफने तिला बाहेर फिरायला जाण्यासाठी तयार केले.
मोहम्मद कैफ हा आकाश आणि विशाल कश्यप या मित्रांसमोरच या तरुणीशी बोलत होता. तिथेच मोहम्मद कैफच्या मित्रांनी या तरुणीवर जबरदस्ती करण्याचे कारस्थान रचले. त्यानंतर तो या तरुणीला नवोदय विद्यालयाच्या समोर असलेल्या सुमसान जंगलात घेऊन गेला. तिथे विशाल आणि आकाशही पोहोचले. तिथे त्यांनी या तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ही तरुणी मदतीसाठी आरडाओरडा करू लागली. तेव्हा आकाश आणि विशालने तिला पकडले. त्यानंतर विशाल याने तिच्या पाठीत चाकू खूपसला. तेव्हा ही तरुणी जीव वाचवण्यासाठी कच्च्या रस्त्याच्या दिशेने धावली. तेव्हा या तिघांनीही तिला पकडले आणि ओढणीने तिचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर हे तिघेही घटनास्थळावरून फरार झाले.