खळबळजनक! पनवेलमध्ये एका गोणीत सापडला मुलाचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 00:34 IST2019-12-17T00:33:51+5:302019-12-17T00:34:35+5:30
मृत मुलगा हा आठ-नऊ वर्षांचा

खळबळजनक! पनवेलमध्ये एका गोणीत सापडला मुलाचा मृतदेह
पनवेल - काही दिवसांपूर्वी पनवेलमधल्या गाढी नदीजवळ एका 30 ते 35 वयोगटातील पुरुषाचा मृतदेह सापडला होता. या व्यक्तीची गळा आवळून हत्या केल्याचं तपासात उघड झालं होतं. ही घटना नुकतीच घडलेली असतानाच पनवेलमध्ये पुन्हा एक मृतदेह आढळून आला आहे.
हा मृतदेह एका लहान मुलाचा आहे. पनवेल येथील कुंडेवहाळ गावच्या हद्दीत जेएनपीटी रोडच्या कडेला एका अज्ञात लहान मुलाचा मृतदेह सोमवारी आढळून आला. एका गोणीमध्ये भरुन या मुलाता मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकण्यात आला होता. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, मृत मुलगा हा आठ-नऊ वर्षांचा असून त्याच्या अंगात ग्रीन टी शर्ट आणि हाफ काळी पॅन्ट घातलेली आहे.
अशाप्रकारे गोणीमध्ये मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मुलाची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून पनवेल शहर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.