पोरांना रागवायचं नाही का? मोबाइलसाठी सोडले घर! मायानगरीत मुली आणि महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 12:52 PM2023-08-28T12:52:57+5:302023-08-28T12:53:22+5:30

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मायानगरी मुंबईत मुली आणि महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते.

Boys don't want to be angry? Home left for mobile! | पोरांना रागवायचं नाही का? मोबाइलसाठी सोडले घर! मायानगरीत मुली आणि महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक

पोरांना रागवायचं नाही का? मोबाइलसाठी सोडले घर! मायानगरीत मुली आणि महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक

googlenewsNext

मुंबई: गेल्या सात महिन्यांत अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याप्रकरणी ७१८ गुन्हे नोंद आहेत. त्यापैकी ६५४ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. मोबाइल दिला नाही, अभ्यास करत नाही म्हणून ओरडल्याच्या रागातही मुले घर सोडत असल्याच्या घटना समोर येत आहेत. 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मायानगरी मुंबईत मुली आणि महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. बेपत्ता झालेली मुलगी अल्पवयीन असल्यास पोलिस लगेचच याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करतात. दर दिवशी किमान तीन अपहरणाच्या गुन्ह्यांची नोंद मुंबई पोलिसांकडे होत आहे. 

रागाने घर सोडले अन् विकृताच्या जाळ्यात अडकला...
  मुलींचा सामान्य तपासातून शोध घेण्यासोबतच ऑपरेशन मुस्कान सारखे उपक्रम राबवूनही पोलिस मुलींचा शोध घेत आहेत; मात्र मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून यावर ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
   रागाने घर सोडणे चेंबूर मधील अल्पवयीन मुलाला महागात पडले. 
  वाटेत एकाची नजर त्याच्यावर पडली आणि त्याच्या विकृत वासनेचा तो शिकार झाल्याची घटना चेंबूरमध्ये घडली आहे. 
   मुलाला विविध ठिकाणी नेत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले.
  धक्कादायक बाब म्हणजे चार महिन्यात तीनवेळा  अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. 

प्रेम प्रकरण अन् बरंच काही
बेपत्ता होणाऱ्या मुलींमध्ये प्रेम प्रकरणातून पळून जाणाऱ्या मुलींचेही प्रमाण अधिक आहे. तसेच काही प्रकरणात मुली सेक्स रॅकेट तसेच मानवी तस्करीच्या शिकार ठरताना दिसतात. तर, राजस्थान, गुजरात सारख्या काही ठिकाणी अल्पवयीन मुलींसह लग्नासाठीही तस्करी होण्याच्या घटनाही पोलिसांच्या कारवाईतून वेळोवेळी समोर येताना दिसतात. 

समुपदेशन करत कुटुंबीयांच्या ताब्यात
पोलिसांकडून मुलीचा शोध घेतल्यानंतर त्यांचे समुपदेशन करत त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येते. पोलिसांच्या निर्भया पथकाद्वारे आतापर्यंत अनेक हरवलेल्या मुलींचा शोध घेत त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title: Boys don't want to be angry? Home left for mobile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.