अंडरगारमेंट्समध्ये लपवून करत होत्या सोन्याची तस्करी, पकडल्या गेल्या 3 महिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 14:43 IST2022-10-10T14:42:10+5:302022-10-10T14:43:51+5:30
Gold Smuggling : जप्त करण्यात आलेल्या सोन्याचं वजन 3283 ग्रॅम आहे. ज्याची किंमत 1 कोटी 72 लाख रूपये सांगितली जात आहे.

अंडरगारमेंट्समध्ये लपवून करत होत्या सोन्याची तस्करी, पकडल्या गेल्या 3 महिला
Gold Smuggling : हैद्राबाद कस्टमने सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली 3 महिला प्रवाशांना अटक केली आहे. या महिलांनी दुबईहून मोठ्या प्रमाणात सोनं त्यांच्या ब्रा, पॅंटी आणि हेअरबॅंडमध्ये ठेवलं होतं. जे कस्टम अधिकाऱ्यांच्या नजरेतून वाचू शकलं नाही. जप्त करण्यात आलेल्या सोन्याचं वजन 3283 ग्रॅम आहे. ज्याची किंमत 1 कोटी 72 लाख रूपये सांगितली जात आहे.
त्याशिवाय हैद्राबाद सीमा शुल्क विभागाने कुवैतहून आलेल्या 2 पुरूषांना अटक केली. त्यांनीही दोन सोन्याच्या छडी, बटन आणि चेक-इन बॅगमधून सोन्याची तस्करी करत होते. यांच्याकडून जप्त करण्यात आलेलं सोनं 855 ग्रॅम आहे. हैद्राबाद कस्टम विभागाला विमानतळावर सतत स्मगलिंगचा माल दुबईहून आणला जात असल्याची सूचना मिळत असते.
रिपोर्टनुसार, दुबईतील फ्लाइटमधून आलेल्या एका महिलेला थांबवण्यात आलं. तिच्या हेअरबॅंड आणि ड्रेसच्या काही भागांमध्ये 234 ग्रॅम सोनं लपवलं होतं. त्यानंतर झडती घेण्यात आली तेव्हा एकापाठी एक तीन महिलांकडे सोनं आढळून आलं. त्यांनी ब्रा, पॅंटीच्या आत सोनं लपवलं होतं.