मंत्रालयात बॉम्ब ठेवलाय; मुलाला शाळेत प्रवेश मिळाला नाही म्हणून गृहविभागाला पाठवला ईमेल
By पूनम अपराज | Published: June 21, 2021 10:12 PM2021-06-21T22:12:12+5:302021-06-22T00:17:04+5:30
Bomb threat in Mantralaya : महत्वाचे म्हणजे मे महिन्यात देखील मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली होती.
पूनम अपराज
मुंबई - मंत्रालयात बॉम्ब ठेवणार असल्याची धमकी देणारा ई मेल प्राप्त झाल्याने मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिसांनी लोकमतशी बोलताना दिली. त्यामुळे मंत्रालय परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे मे महिन्यात देखील मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली होती.
आज सायंकाळी ६ वाजता मंत्रालयातील सुरक्षा विभागाला धमकीचा मेल प्राप्त झाला. त्यानुसार बॉम्ब नाशक आणि शोधक पथक मंत्रालय परिसरात पोहचले आणि परिसर पिंजून काढला.
Maharashtra | One arrested for sending fake threats via email to bomb Mumbai Mantralaya. He has been detained from Pune's Ghorpadi area and will be handed over to Mumbai police. Case registered at Mumbai's Marine Drive Police Station: Mumbai Police pic.twitter.com/RCnGv63JXc
— ANI (@ANI) June 21, 2021
पुण्यातून एकाला अटक
मंञालयात बाँम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल पुण्यातून आला होता. याठिकाणी शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीला मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मुलाला शाळेत एडमिशन मिळाले नाही म्हणून गृहविभागाला धमकीचा ईमेल केला. शैलेश हा घोरपडी येथील राहणारा आहे
याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत
राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात रविवारी बॉम्ब ठेवल्याच्या फेक मेलने मोठी खळबळ उडाली आहे. ३० मे रोजी देखील एका अज्ञात व्यक्तीने मंत्रालयात दूरध्वनी करुन बॉम्ब ठेवल्याचे सांगितले होते. यानंतर सुरक्षायंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या असून वेगाने कामाला लागल्या होत्या. मात्र, काहीवेळानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. नागपूरमधील सागर मंदेरे या तरुणाने हा दूरध्वनी केला होता. हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली.
३० मे रोजी मंत्रालयाच्या कंट्रोल रुममध्ये दुपारी पाऊणच्या सुमारास हा फोन आला होता. त्यानंतर बॉम्बशोधक पथक मंत्रालयात दाखल झाले आणि शोधमोहीम सुरु झाली . मंत्रालयातील तिन्ही इमारतींमध्ये सध्या सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे समजते. डॉग स्क्वाड सध्या बॉम्बचा शोध घेत आहे. मात्र, सारा परिसर पिंजून काढल्यानंतरही कोणतीही स्फोटके सापडली नाहीत. दरम्यान, या निनावी दूरध्वनीनंतर मंत्रालयाच्या परिसरातील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अन्य यंत्रणांचे प्रमुख अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.