Breaking: मुंबई-गोवा महामार्गावर पहाटे थरार, गोळीबार; 2 नंबरवाल्यांमध्ये राडा, लक्झरी प्रवाशांचे सोने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 08:41 AM2023-03-13T08:41:42+5:302023-03-13T08:44:37+5:30

Mumbai-Goa Highway Crime: तीस ते पस्तीस जणांच्या टोळक्याने दोन व्यावसायिकांच्या वादातून लक्झरी बसवर दगडफेक करत गोळीबारही केल्याची घटना घडली आहे. 

Breaking: Early morning thrill on Mumbai-Goa highway; Rada among illegal businessmen's, looted gold from luxury passengers, beat them crime news | Breaking: मुंबई-गोवा महामार्गावर पहाटे थरार, गोळीबार; 2 नंबरवाल्यांमध्ये राडा, लक्झरी प्रवाशांचे सोने लुटले

Breaking: मुंबई-गोवा महामार्गावर पहाटे थरार, गोळीबार; 2 नंबरवाल्यांमध्ये राडा, लक्झरी प्रवाशांचे सोने लुटले

googlenewsNext

लुटालुटीच्या दृष्टीने अद्यापही काहीसा सुरक्षित असलेला मुंबई-गोवा महामार्गही आता अवैध धंदेवाल्यांचा अड्डा बनू लागला आहे. रस्त्याचे काम सुरु असले तरी या मार्गाने कोकणात रात्रीच्यावेळी लक्झरी बसेस, खासगी कार ये जा करत असतात. त्यांच्यासाठी हादरवणारी घटना पहाटे तीन वाजता घडली आहे. 

पेण तालुक्यातील कोपर फाटा येथील हॉटेल मिलन पॅलेस समोर दोन नंबरच्या धंदेवाल्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पहायला मिळाले आहे. यामध्ये तीस ते पस्तीस जणांच्या टोळक्याने दोन व्यावसायिकांच्या वादातून लक्झरी बसवर दगडफेक करत गोळीबारही केल्याची घटना घडली आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे लक्झरीतील प्रवाशांनाही मारहाण करण्यात आली आहे. वृद्ध, महिला यांनाही या अवैध धंदेवाल्यांनी सोडले नाही. एका एका प्रवाशाला चार-चार ते पाच जण मारहाण करत होते. सोडवायला गेलेल्या इतर प्रवाशांचे दागिनेही लुटण्यात आले आहेत. 



 

पहाटेपासून हा थरार सुरु होता. लुटालुट झाल्याने ती लक्झरी आणि त्यातील प्रवाशी अजूनही तिथेच थांबले आहेत. हे प्रवासी दापोली वरून बोरीवलीला जात होते. यावेळी तीन चार गाड्यांमधून आलेल्या ३०-३५ या लोकांनी त्यांना मारहाण केली. महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, चैन, तिच्या पतीच्या गळ्यातील चैन आदी गोष्टी या लोकांनी हिसकावून नेल्या आहेत. 

Web Title: Breaking: Early morning thrill on Mumbai-Goa highway; Rada among illegal businessmen's, looted gold from luxury passengers, beat them crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.