Breaking : साकीनाका बलात्कार प्रकरणी मोहन चौहानला फाशीची शिक्षा, सत्र न्यायालयाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 03:52 PM2022-06-02T15:52:14+5:302022-06-02T15:54:34+5:30
Sakinaka Rape And Murder Case : आज दिंडोशी सत्र न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
मुंबई : ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर आठ महिन्यांनी दिंडोशी सत्र न्यायालयाने (Dindoshi Sessions Court) सोमवारी ४४ वर्षीय आरोपी मोहन चौहानला दोषी (Convicted) ठरवलं होतं. आज दिंडोशी सत्र न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
मोहन चौहानला खून, बलात्कार आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याच्या संबंधित कलमांसह दोषी ठरवण्यात आलं होतं. १० सप्टेंबर २०२१च्या मध्यरात्री साकी नाका येथे महिला जखमी अवस्थेत आढळली. तिला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे ११ सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यात चौहानला अटक करण्यात आली. राज्य सरकारने या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांची नियुक्ती केली होती. अवघ्या १८ दिवसांत पोलिसांनी चौहानविरुद्ध ३४६ पानांचे आरोपपत्र दाखल केले. असा दावा करण्यात आला आहे की, आरोपीने पीडितेच्या खाजगी भागात धारदार वस्तू घातली होती, ज्यामुळे गंभीर जखमा झाल्या होत्या.
Maharashtra | Dindoshi sessions court in Mumbai awards death penalty to convict Mohan Chauhan in connection with the rape of a 30-year-old woman in Sakinaka in September 2021. The woman had later passed away at the hospital.
— ANI (@ANI) June 2, 2022