bribe : आपल्याच कार्यालयातील कर्मचा-याकडून लाच मागणार्‍या उपविभागीय अभियंत्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 10:45 AM2021-08-09T10:45:26+5:302021-08-09T10:46:26+5:30

Brime Case: आपल्याच कार्यालयातील कर्मचार्‍याकडे लाच मागितल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बारामती येथे कारवाई करुन एका जलसंपदा विभागातील एका उपविभागीय अभियंत्यासह खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

bribe: File a case against a sub-divisional engineer for soliciting bribe from an employee of his own office | bribe : आपल्याच कार्यालयातील कर्मचा-याकडून लाच मागणार्‍या उपविभागीय अभियंत्यावर गुन्हा दाखल

bribe : आपल्याच कार्यालयातील कर्मचा-याकडून लाच मागणार्‍या उपविभागीय अभियंत्यावर गुन्हा दाखल

Next

पुणे : आपल्याच कार्यालयातील कर्मचार्‍याकडे लाच मागितल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बारामती येथे कारवाई करुन एका जलसंपदा विभागातील एका उपविभागीय अभियंत्यासह खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. (File a case against a sub-divisional engineer for soliciting bribe from an employee of his own office)

उपविभागीय अभियंता संजय नारायण मेटे (भीमा उपसा सिंचन प्रकल्प, पलसदेव, ता. इंदापूर) आणि पोपट दशरथ शिंदे (रा. बारामती) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार  हे भीमा उपसा सिचंन प्रकल्पाच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या ५७ वर्षाच्या कर्मचार्‍याने ही तक्रार दिली आहे. त्यांचे मेडिकल बील मंजुरीसाठी उपविभागीय अभियंता संजय मेटे यांच्याकडे आले होते. बील मंजूर करण्यासाठी त्यांनी २ ऑगस्ट रोजी ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याला खासगी व्यक्ती पोपट शिंदे याने प्रोत्साहन दिले. तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने रविवारी सापळा लावण्यात आला होता. मात्र, आरोपींना संशय आल्याने ते लाच स्वीकारण्यासाठी आलेच नाहीत. मात्र, लाचेची मागणी करण्यात आली असल्याने दोघांविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भारत साळुंखे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: bribe: File a case against a sub-divisional engineer for soliciting bribe from an employee of his own office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.