लाचखोर हवालदार एसीबीच्या जाळ्यात, गुन्हा दाखल न करण्यासाठी घेतली पाच हजारांची लाच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 07:54 PM2020-10-08T19:54:32+5:302020-10-08T19:54:58+5:30

Bribery Case : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील 50 तक्रारदाराविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात अर्ज आल्यानंतर त्यावरुन गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात हवालदार सतीश रमेश पाटील (रा.पिंप्राळा, जळगाव) याने 8 रोजी पाच हजारांची लाच मागितली होती.

A bribe of Rs 5,000 was taken by the corrupt constable ACB for not filing a case | लाचखोर हवालदार एसीबीच्या जाळ्यात, गुन्हा दाखल न करण्यासाठी घेतली पाच हजारांची लाच

लाचखोर हवालदार एसीबीच्या जाळ्यात, गुन्हा दाखल न करण्यासाठी घेतली पाच हजारांची लाच

googlenewsNext
ठळक मुद्देया तक्रारीनुसार गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सापळा रचुन पोलिस ठाणे आवारात लाच स्वीकारतांना  सतीश रमेश पाटील यास अटक करण्यात आली.

जळगाव - तक्रारदाराविरुद्ध आलेल्या अर्जावरुन गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाचेची मागणी करुन ती स्विकारणारया नशिराबाद पोलिस ठाण्यातील हवालदार सतीश रमेश पाटील (रा.पिंप्राळा, जळगाव) यास जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अटक केली आहे.

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील 50 तक्रारदाराविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात अर्ज आल्यानंतर त्यावरुन गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात हवालदार सतीश रमेश पाटील (रा.पिंप्राळा, जळगाव) याने 8 रोजी पाच हजारांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सापळा रचुन पोलिस ठाणे आवारात लाच स्वीकारतांना  सतीश रमेश पाटील यास अटक करण्यात आली.

 पोलिस उपअधीक्षक गोपाल ठाकुर, निरीक्षक संजोग बच्छाव, रवींद्र माळी, अशोक अहिरे, सुनील पाटील, सुरेश पाटील, सुनील शिरसाठ, मनोज जोशी, जनार्धन चौधरी, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: A bribe of Rs 5,000 was taken by the corrupt constable ACB for not filing a case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.