दोन हजार रूपयांची लाच भोवली; दुचाकी सोडविण्यासाठी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 07:50 PM2021-03-25T19:50:52+5:302021-03-25T19:51:33+5:30

Bribe Case : लाचखोर हवालदारास रंगेहात पकडले

A bribe of two thousand rupees; Demand for release the bike | दोन हजार रूपयांची लाच भोवली; दुचाकी सोडविण्यासाठी केली मागणी

दोन हजार रूपयांची लाच भोवली; दुचाकी सोडविण्यासाठी केली मागणी

Next
ठळक मुद्देडुग्गीपार पोलीस ठाण्यातंर्गत कोहमारा चौकात गुरूवारी (दि.२५) ही कारवाई करण्यात आली आहे. संजय उमाजी वडेट्टीवार (४६) असे लाचखोर हवालदाराचे नाव आहे. 

गोंदिया : जुगार प्रकरणात न अडकविण्यासाठी व धाडीत पकडलेली दुचाकी सोडण्यासाठी दोन हजार रूपयांची मागणी करून रक्कम स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदारास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. डुग्गीपार पोलीस ठाण्यातंर्गत कोहमारा चौकात गुरूवारी (दि.२५) ही कारवाई करण्यात आली आहे. संजय उमाजी वडेट्टीवार (४६) असे लाचखोर हवालदाराचे नाव आहे. 

तक्रारदार शेतकरी असून ते ७ मार्च रोजी शेतात किटकनाशक फवारणीसाठी दुचाकी क्रमांक एमएच ३५-एडी ११५३ ने गेले होते. यावेळी डुग्गीपार पोलिसांनी तेथे धाड घालून जुगार खेळणाऱ्यांसोबतच तक्रारदारांचीही दुचाकी उचलून पोलीस ठाण्यात जमा केली होती. यावर तक्रारदाराने बीट अमलदार हवालदार वडेट्टीवार यांना दुचाकी सोड‌ण्यास म्हटले असता त्याने न्यायालयातून सोडवून घे असे म्हटले. त्यानंतर १८ मार्च रोजी तक्रारदाराने वडेट्टीवारला मोबाईलवर संपर्क करून दुचाकीसाठी न्यायालयात अर्ज केल्याचे सांगीतले असता त्याने जुगाराच्या गुन्ह्यात अडकायचे नसल्यास व दुचाकी सोडवायची असल्यास गुपचाप दोन हजार रूपये दे असे म्हटले. तसेच २४ मार्च रोजी वडेट्टीवारने तक्रारदारास मोबाईलवरून संपर्क साधून ठाण्यात ये असे म्हटले. यावर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली. तक्रार पडताळणी करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी (दि.२५) कोहमारा चौकात सापळा लावला. यात वडेट्टीवारने पंचासमक्ष तक्रारदाराकडून दोन हजार रूपयांची लाच घेतली असता पथकाने त्याला रंगेहात पकडले. डुग्गीपार पोलीस ठाण्यात या प्रकरणी लाप्रका १९८८ कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: A bribe of two thousand rupees; Demand for release the bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.