लाचखोर म्हाडा लेखापालास एसीबीने केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 08:55 PM2019-01-08T20:55:36+5:302019-01-08T20:57:43+5:30
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने सापळा रचून शेखला २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.
मुंबई - म्हाडाचा विभागीय लेखापाल रशीद अली हैदर शेखला २ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) अटक केली आहे. तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांनी वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात निविदा दाखल केली होती. सदरची निविदा नामंजूर झाल्याने निविदेसाठी भरणा केलेल्या अनंत रक्कम परत मिळण्यासाठी शेखकडे गेले होते. मात्र, शेख यांनी २ हजार ची लाच मागितली व लाच न दिल्यास पुढील निविदेचे पैसे अडकवून ठेवण्याची धमकी दिली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने सापळा रचून शेखला २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.