मध्यरात्री नवविवाहित महिलेने केला 'असा' कांड; पतीसह संपूर्ण घर हैराण, तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 06:19 PM2023-02-07T18:19:11+5:302023-02-07T18:19:27+5:30

बिहारमध्ये राहणाऱ्या सविताच्या आई-वडिलांना आणि नातेवाइकांना फोन केला पण कोणीही फोन उचलत नाही.

Bride Absconded After 15 Days Of Marriage With Jewellery Cash In Shahjahanpur | मध्यरात्री नवविवाहित महिलेने केला 'असा' कांड; पतीसह संपूर्ण घर हैराण, तपास सुरू

मध्यरात्री नवविवाहित महिलेने केला 'असा' कांड; पतीसह संपूर्ण घर हैराण, तपास सुरू

googlenewsNext

शाहजहांपूर - जिल्ह्यातील तिल्हार इथं लग्नाला १५ दिवस झालेल्या नवरीनं असा कांड केला ज्यानं नवऱ्यासह सासरच्यांची झोप उडाली. घरातील सर्व रोकड घेऊन नवरी पळाली. ही मुलगी बिहारमध्ये राहणारी होती. नवरीच्या या कृत्यानंतर पती आणि सासरच्यांनी पोलीस ठाण्यात चोरीबाबत तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर मुलीचा शोध घेण्यासाठी नातेवाईकांनी बिहार गाठले. 

बांधा गावातील रहिवासी नरेश जाटव यांनी सांगितले की, आम्ही २२ जानेवारी रोजी मोठा मुलगा वेदपाल याचे लग्न पश्चिम चंपारण (बिहार) येथील सविता कुमारीसोबत केले होते. सविता ही नरेशच्या भावाच्या मेहुणीची मुलगी. त्याने हे लग्न लावून दिले होते. रविवारी रात्री त्याची पत्नी रचना, मुलगी उर्मिला आणि मुलगा वेदपाल, सून सविता घरी होते असं त्यांनी सांगितले. 

रात्री एक वाजता वधू घरी होती
मध्यरात्री सविता दागिने आणि पाच हजार रुपये घेऊन घराबाहेर निघून गेली. तिल्हार येथील उर्समध्ये मी खेळण्यांचे दुकान थाटले होते. सोमवारी सकाळी सहा वाजता मला फोन आला, सविता रात्री दागिने आणि पैसे घेऊन घरातून निघून गेल्याचं सांगण्यात आले. रात्री एक वाजेपर्यंत सविता घरातच असल्याचे सांगितले. सर्वजण गाढ झोपेत गेल्यानंतर ती दागिने व पैसे घेऊन निघून गेली.

नरेशने सांगितले की, त्याने बिहारमध्ये राहणाऱ्या सविताच्या आई-वडिलांना आणि नातेवाइकांना फोन केला पण कोणीही फोन उचलत नाही. तर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी नातेवाईक बिहारला गेले आहेत. अद्याप कोणताही रिपोर्ट दाखल झालेला नाही अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक यतेंद्र यांनी दिली. 

Web Title: Bride Absconded After 15 Days Of Marriage With Jewellery Cash In Shahjahanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.