बोंंबला! मधुचंद्राच्या रात्रीच नवरी-नवरदेवात जबर हाणामारी, दोघांचीही कारणे वाचून व्हाल थक्क....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 09:09 AM2020-12-23T09:09:05+5:302020-12-23T09:09:31+5:30
या दोघांच्या भांडणात सासरची इतर मंडळीनींही उडी घेतली आणि नंतर सर्वांनीच नवरीला बेदम मारहाण केली. रडत-पडत कशीतरी ही रात्र निघाली.
उत्तर प्रदेशातील महराजगंज जिल्ह्यात अग्निला साक्षी मानत सात जन्मापर्यंत साथ देण्याचं आश्वासन एकमेकांना देणारी नवरी-नवरदेव चक्क मधुचंद्राच्या रात्रीच एकमेकांसोबत भांडले. सासरी पोहोचताच नवरी आणि नवरदेवात काही गोष्टीवरून वाद झाला आणि दोघांमध्ये मारामारी सुरू झाली. त्यामुळे परिसरात एक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
या दोघांच्या भांडणात सासरची इतर मंडळीनींही उडी घेतली आणि नंतर सर्वांनीच नवरीला बेदम मारहाण केली. रडत-पडत कशीतरी ही रात्र निघाली. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरीने तिला मारहाण झाल्याची माहिती माहेरच्या लोकांना दिली. तिचे परिवारवाले तिथे आले आणि वाद आणखी पेटला.
नवरी सासरी रहायला तयार नव्हती आणि आपल्या माहेरी परत आली. मंगळवारी नवरी आपल्या आईसोबत पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिथे संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. तसेच मारहाण केल्याचे निशाणही दाखवले. पोलिसांनी नवरीच्या आईच्या तक्रारीवरून नवरदेवसहीत त्याच्या घरातील पाच लोकांवर हुंड्यासाठी त्रास दिल्याची तक्रार दाखल केली.
मधुचंद्राच्या रात्री मारझोड झाल्याप्रकरणी नवरी-नवरदेवाने एकमेकांवर काही आरोप लावले आहेत. नवरदेव विशालने सांगितले की, नवरी रूममध्ये सतत कुणासोबत तरी फोनवर बोलत होती. यामुळे घरात चर्चा सुरू झाली. कुणासोबत बोलतेय असं विचारलं तरी माझ्यावर भडकली. यावरूनच झालेली बाचाबाची मारझोडीवर गेली.
तेच नवरीचं म्हणणं आहे की, सासरी गेल्यावर पूर्ण दिवस गेला पण पती रूममध्ये आलाच नाही. सासरचे लोक त्याला रूममध्ये पाठवत होते. पण तरी तो येत नव्हता. मोठ्या दबावानंतर तो रूममध्ये आला आणि असभ्य भाषेचा प्रयोग करू लागला होता. विरोध केला तर त्याने मला मारझोड केली. नंतर सासरचे सगळे लोक पतीकडून झाले आणि हुंड्यावरून मारझोड करू लागले.