ब्रिगेडियर अनंत नाईक आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल; महिला अधिकाऱ्याचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 11:28 PM2021-04-23T23:28:14+5:302021-04-23T23:28:29+5:30

नाईक हे हेड ऑफ द डिपार्टमेंट हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन येथे ब्रिगेडियर म्हणून कार्यरत होते. ते भुवनेश्वर येथील रहिवासी आहेत. पुण्यातील एएफएमसी येथे कार्यरत होते. 

Brigadier Anant Naik suicide case FIR Lodged; Including female officers | ब्रिगेडियर अनंत नाईक आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल; महिला अधिकाऱ्याचा समावेश

ब्रिगेडियर अनंत नाईक आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल; महिला अधिकाऱ्याचा समावेश

googlenewsNext

लष्कराच्या एएफएमसीतील ब्रिगेडियर अनंत नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी पुणे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांना त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात महिला अधिकाऱ्यासह चौघांचा समावेश आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यातून हा प्रकार समोर आला आहे.


याप्रकरणी पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात ब्रिगेडियर ए. के श्रीवास्तव, लष्कर महिला मेजर बलप्रीत कौर, मेजर मेजर निलेश पटेल आणि लेफ्टनंट कर्नल कुशाग्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे होती. त्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आनता नाईक यांचा मुलगा अभिषेक नाईक यांनी तक्रार दिली आहे. 


नाईक हे हेड ऑफ द डिपार्टमेंट हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन येथे ब्रिगेडियर म्हणून कार्यरत होते. ते भुवनेश्वर येथील रहिवासी आहेत. पुण्यातील एएफएमसी येथे कार्यरत होते. 

दरम्यान आज रविवारी सकाळी सरकारी गाडी घेऊन चालक बोडके यांना घेऊन पुणे रेल्वे स्थानक परिसरात आले होते. यावेळी त्यांनी चालक बोडके यांना एमसीओ मधून जाऊन येतो, असे सांगितले व त्यांना गाडीत थांबा असे म्हंटले. त्यानंतर दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या त्यांनी उद्यान एक्सप्रेस गाडीच्या इंजिनसमोर येऊन आत्महत्या केल्याचा केली. फलाट क्रमांक तीनवर हा प्रकार घडला आहे. माहिती मिळताच लोहमार्ग अधीक्षक सदानंद वायसे पाटील व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांची तपासणी केली. पण त्यांच्याकडे सुसाईड नोट मिळाली नाही. यानंतर त्यांच्या मुलाला या घटनेची माहिती दिली. मुलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. 

दरम्यान याप्रकरणी लोहमार्ग पोलीस अधिक्षक सदानंद वायसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत होते. यावेळी लोहमार्ग पोलिसांना नाईक यांच्या घरी सुसाईड नोट मिळून आली आहे. त्यात त्यांनी या चौघांनी त्रास दिला. तसेच, माझी विनाकारण चौकशी लावली. तसेच, चांगली प्रतिष्ठा खराब केली. कौर हिने आरोप केले असे लिहिले आहे. त्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. 


---चौकट---

नाईक यांच्या आत्महत्येचा प्रकार एका पाणी सप्लाय करणाऱ्या व्यक्तीने पाहिला होता. तर सीसीटीव्हीत ते फलाट क्रमांक एकवर फिरत असताना दिसले होते. तसेच त्यांनी चेन्नई एक्सप्रेससमोर देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असे सीसीटीव्हीतून दिसत होते. 

Web Title: Brigadier Anant Naik suicide case FIR Lodged; Including female officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे