टिकटॉकवरून आक्षेपार्ह्य व्हिडीओ प्रसारित; अंबाजोगाई तालुक्यातील तरुणाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 13:02 IST2020-06-10T13:02:13+5:302020-06-10T13:02:49+5:30
तरुणाने टिकटॉकसह इतर सोशल मीडियातून व्हिडीओ प्रसारित केले

टिकटॉकवरून आक्षेपार्ह्य व्हिडीओ प्रसारित; अंबाजोगाई तालुक्यातील तरुणाला अटक
अंबाजोगाई : धार्मिक तेढ निर्माण करणारा व्हिडीओ तयार करून टिकटॉकवर प्रसारित केल्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील उमराई येथील श्रीनाथ बालासाहेब केंद्रे या तरुणावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
श्रीनाथ केंद्रे याने ‘टिकटॉक’वरून काही धार्मिक तेढ निर्माण करणारे व्हिडीओ स्वत: तयार करुन प्रसारित केले असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयास मिळाली होती. अधीक्षक कार्यालयाकडून याबाबत तपास करण्याच्या सूचना धारूर पोलीस ठाण्यास देण्यात आल्या होत्या. धारूर पोलिसांनी चौकशी केली असता श्रीनाथने टिकटॉकसह इतर सोशल मीडियातून प्रसारित केल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलीस शिपाई परमेश्वर सुरेश वखरे यांच्या फिर्यादीवरून श्रीनाथ केंद्रेवर धारूर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई सहा. पोलीस निरीक्षक सुरेखा धस आणि धारूर पोलीस कर्मचारी स्टाफ यांनी पार पडली.
लॉकडाऊननंतर आतापर्यंत बीड जिल्हात अफवा तसेच सामाजिक, धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देश्याने सोशल मिडीया व इतर माध्यमातून पोस्ट किंवा व्हिडीओ प्रसारित पसरविणाऱ्यावर ६० व्यक्तींवर वेगवेगळे ४८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.