कुलूप तोडून हॉटेलात शिरला; चोरटा, रोकड, सीपीयू घेऊन पसार...; चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

By सागर दुबे | Published: March 27, 2023 09:00 PM2023-03-27T21:00:50+5:302023-03-27T21:01:15+5:30

मध्यरात्री घडलेली ही संपूर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

broke the lock and entered the hotel Thieves abscond with cash and CPU | कुलूप तोडून हॉटेलात शिरला; चोरटा, रोकड, सीपीयू घेऊन पसार...; चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

कुलूप तोडून हॉटेलात शिरला; चोरटा, रोकड, सीपीयू घेऊन पसार...; चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

googlenewsNext

जळगाव : ममुराबाद रस्त्यावरील प्रजापत नगरातल्या हॉटेल मितवाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्याने काउंटरमधून १७ हजार रूपयांच्या रोकडसह २ हजार रूपये किंमतीचा सीपीयू चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. मध्यरात्री घडलेली ही संपूर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिपेठेतील चेतन अनिल वाणी यांच्या मालकीची ममुराबाद रस्त्यावरील प्रजापत नगर येथे मितवा नावाने हॉटेल आहे. रविवारी रात्री दहा वाजता नेहमीप्रमाणे वाणी हे हॉटेल बंद करुन घरी निघून केले. मध्यरात्री एक चोरटा हॉटेलचे शटरचे कुलूप तोडून आत शिरला. त्यानंतर काउंटरवरील गल्ल्यातून रोकड आणि सीपीयू घेवून पसार झाला. सोमवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास वाणी हे हॉटेल उघडण्यासाठी आले, त्यावेळी त्यांना हॉटेलचे शटर एका बाजूने थोडे उचकलेल्या अवस्थेत दिसले. हॉटेलात प्रवेश केल्यानंतर त्यांना काऊंटरमधील चिल्लर व चाव्या या काऊंटरवर दिसल्या. त्यांनी लागलीच गल्ल्याची तपासणी केली. त्यावेळी त्यातील १७ हजारांची रोकड व हॉटेलमधील सीपीयू गायब झालेला दिसून आला.  

चोरटा सीसीटीव्ही कॅमे-यात कैद
चोरीच्या घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.  तसेच श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. हॉटेलातून चोरट्याच्या हाताचे ठसे घेतले असून त्या आधारावर पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास एक चोरटा हातात बॅटरी घेवून हॉटेलमध्ये शिरताना दिसून आला. त्याने हॉटेलच्या गल्ल्यातील रोकड लांबवून तो सुमारे पंधरा ते वीस मिनिट हॉटेलच्या आवारात फिरत होता. त्यानंतर चोरटा दुचाकीने ममुराबाद गावाच्या दिशेने गेल्याची संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले.
 

Web Title: broke the lock and entered the hotel Thieves abscond with cash and CPU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.