पोलीस कर्मचाऱ्याने भाड्याने दिलेल्या घरात सुरु होता कुंटणखाना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 10:38 PM2020-06-08T22:38:04+5:302020-06-08T22:43:35+5:30
जळगावात कारवाई : चार जणांना घेतले ताब्यात
जळगाव : पोलीस कर्मचाऱ्याने भाड्याने दिलेल्या घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर सोमवारी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून धाड टाकली. त्यात घर मालक, मालकीन व दोन तरुणी अशा चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, आपल्या मालकीच्या घरात असा प्रकार सुरु असल्याचा प्रकार ऐकून पोलीस कर्मचाऱ्या लाही धक्का बसला आहे. याबाबत हा कर्मचारी अनभिज्ञ होता. वाघ नगरातील शिक्षक कॉलनीत हा प्रकार सुरु होता.
सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, हवालदार सुनील दामोदरे, दिनेश बडगुजर, शरद भालेराव, रवींद्र घुगे, रामकृष्ण पाटील, महेश पाटील, वैशाली महाजन, मीनल साकळीकर, सविता परदेशी, रमेश जाधव व इद्रीस पठाण यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी वाघ नगरातील शिक्षक कॉलनीत एका घरात बनावट ग्राहक पाठविला. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता तेथे तीन महिला व एक पुरुष असे चार जण आढळून आले. घराचा भाडेकरु रिक्षा चालक असून तो पत्नीसह या घरात रहात होता. नांदूरा व सुरत येथील दोन तरुणींच्या माध्यमातून तो कुंटणखाना चालवत होते. ही माहिती पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनाच मिळाली होती. त्यावरुन सोमवारी ही कारवाई करण्यात आली.
पोलीस कर्मचारी अनभिज्ञ
पोलिसांनी दोन तरुणी व पती-पत्नी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता घराचे मालक पोलीस दलात कर्मचारी असून ते शहरातच कार्यरत आहेत. या व्यवसायाबाबत त्यांना कोणतीही माहिती नव्हती. ते अनभिज्ञ होते. कारवाईची माहिती मिळाल्यानंतर या कर्मचाऱ्याला धक्काच बसला. दरम्यान, या चारही जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले होते.
अन्य महत्वाच्या बातम्या :
धक्कादायक! अनुकंपा नोकरी मिळविण्यासाठी पित्याला ठार मारले; आई, भावाचीही मदत
खूनप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत दाखल
३० वर्षांपूर्वी झाला होता कथित 'मृत्यू'; बँक फसवणुकीत CBIची तपासाची चक्रे फिरली अन् निघाला जिवंत
आयएएस अधिकाऱ्यावर महिलेने केला लैंगिक शोषणाचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी केले निलंबित
उमरग्यात खून करुन पुण्यात आलेल्या दोघांना अटक
लॉकडाऊन दरम्यान स्पा सेंटरच्या नावाखाली चालवले जात होते सेक्स रॅकेट
चोरांनी दिलं पोलिसांना खुलं आव्हान; फिल्मी स्टाईलनं सांगितली चोरीची वेळ अन् तारीख