धक्कादायक! वडिलाच्या मृतदेहासाठी भर चौकात भाऊ-बहिणीत हाणामारी, पोलीस पोहचले आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 12:35 PM2021-08-07T12:35:35+5:302021-08-07T12:39:51+5:30
रातील प्रमुख व्यक्तीचं निधन झाल्यावर अंत्यसंस्कार कोण करणार यावरून भाऊ-बहिणी आणि जावयांमध्ये हाणामारी झाली. ही घटना कानपूरच्या बिल्होरमधील आहे.
कानपूरमधून एक मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. असं सांगितलं जात आहे की, हे भांडण अंत्यसंस्कार करण्यावरून झालं. घरातील प्रमुख व्यक्तीचं निधन झाल्यावर अंत्यसंस्कार कोण करणार यावरून भाऊ-बहिणी आणि जावयांमध्ये हाणामारी झाली. ही घटना कानपूरच्या बिल्होरमधील आहे.
गुरूवारी वडिलांच्या अंत्यसंस्कारावरून परिवारात वाद झाला. हळूहळू मृत व्यक्तीच्या मुलांमध्ये आणि जावयांमध्ये वाद पेटला. मग बघता बघता भर चौकात एकमेकांना मारामारी सुरू केली. घटनास्थळी उपस्थित कुणीतरी याचा व्हिडीओ काढला आणि व्हायरल केला. (हे पण वाचा : Shocking! पतीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीने सर्वांसमोर कापले तरूणीचे केस, हसत राहिले लोक...)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ८५ वर्षाचे रामप्रसाद हे कॅन्सरमुळे दोन वर्षांपासून आजारी होते. दोन्ही मुलं त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. ज्यामुळे ते आपली मुलगी कमलेश कुमारीकडे राहण्यासाठी गेले होते. त्यांनी सर्व जमीन मुलीच्या नावावर केली होती. ज्यामुळे दोन्ही मुलं नाराज होते.
शुक्रवारी सकाळी रामप्रसाद यांचं निधन झालं. मुलगी आणि नातू त्यांचं अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह गंगा घाटावर नेत होते. आऱोप आहे की, रस्त्यात तिच्या दोन्ही भावांनी वडिलांचा मृतदेह हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावरून दोन्ही पक्षात वाद सुरू झाला आणि नंतर मारहाण सुरू झाली.
वादाची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मारहाण करणाऱ्या लोकांना पकडून पोलीस स्टेशनला घेऊन गेले. यादरम्यान चालक ट्रॅक्टरवर ठेवलेला मृतदेह घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. पोलिसांनी दोन्ही पक्षांना समजावून सांगून वाद मिटवला. याप्रकरणी सीओ राजेश कुमार म्हणाले की, भाऊ-बहिणीत अंत्यसंस्कारावरून मारहाण झाली होती. दोन्ही पक्षातील लोकांना समजावलं आणि अंत्यसंस्कारासाठी पाठवण्यात आलं.