भावासह बहिणीला दूचाकीवरुन पळवले, १० वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपी CCTV मध्ये कैद
By मारोती जुंबडे | Published: September 6, 2022 11:28 AM2022-09-06T11:28:04+5:302022-09-06T11:28:58+5:30
सेलू शहरातील १० वर्षीय भावडांस दुचाकीवर पळवून नेत मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात ६ सप्टेंबर रोजी पहाटे ३:३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवगावफाटा :
सेलू शहरातील १० वर्षीय भावडांस दुचाकीवर पळवून नेत मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात ६ सप्टेंबर रोजी पहाटे ३:३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना ५ सप्टेंबर रोजी भरदिवसा घडली.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन अनोळखी आरोपीनी सांगणनमत करून ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता विद्यानगर सेलू येथुन १० वर्षाची मुलगी व १० वर्ष वयाचा पिडीत मुलीचा मावसभाऊ या दोघांना दुचाकीवर जबरदस्ती बसवून पळून नेले. त्यापैकी मुलास वालूर मार्गे नेत कौसडी फाटा येथील रस्त्यावर सोडून देऊन पीडित मुलगीस कोक शिवारात नेऊन जबरदस्तीने अत्याचार केला. या प्रकरणी पिडित मुलीच्या आईने सेलू पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ६ सप्टेंबर रोजी पहाटे ३:३० वाजता दोन अनोळखी ईसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलीस निरिक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक जयंत मिना,अप्पर पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन,उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश कुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि चव्हाण यांनी भेट दिली. पोउपनी भाग्यश्री पुरी यांच्याकडे तपास दिला आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्रकार कैद
पोलीस अधिक्षक जयंत मिना यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर तपासाची चक्रे गतीमान झाली. पोलीस यंत्रणेला सिसिटीव्ही फूटेज तपासणीमध्ये एका दुचाकीवरून दोन आरोपी हे या पिडीत मुलीस व मुलास घेऊन जातांना दिसुन येत आहेत. दुचाकीवरील दोन अनोळखी आरोपींने आपली तोंडे काळ्या कपड्याने झाकले आहेत. तर एकाचा शर्ट लाल तर दुसऱ्याचा पिवळा रंगाचा दिसत आहे. सेलू शहरात भरदिवसा घडलेला या प्रकाराने संतप्त प्रतिक्रिया उमटत असून आरोपींचा शोध घेण्याचे आवाहन पोलीसांसमोर आहे.