उल्हासनगरमध्ये संपतीच्या वादातून भावावर केला चाकूने हल्ला
By सदानंद नाईक | Updated: February 22, 2023 17:40 IST2023-02-22T17:40:21+5:302023-02-22T17:40:51+5:30
उल्हासनगर - संपत्तीच्या वादातून कैलास व जगदीश कुमावत या दोन भावात मंगळवारी शिवाजी चौकात तू तू मैं मैं झाल्यावर ...

उल्हासनगरमध्ये संपतीच्या वादातून भावावर केला चाकूने हल्ला
उल्हासनगर - संपत्तीच्या वादातून कैलास व जगदीश कुमावत या दोन भावात मंगळवारी शिवाजी चौकात तू तू मैं मैं झाल्यावर जगदीश कुमावत व त्याचा मुलगा अर्जुन यांनी कैलास यांच्यावर चाकूने हल्ला करून जखमी केले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कैलास यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ अनिल-अशोक चित्रपटगृहा परिसरातील मिलननगर येथे राहणारे कैलास रामसिंग कुमावत व जगदीश रामसिंग कुमावत या दोन भावात संपतीवरून वाद आहे. मंगळवारी कॅम्प नं-३ छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन भाऊ एकमेकांसमोर आल्याने, त्यांच्यात तू तू मैं मैं होऊन हाणामारी झाली. त्यानंतर जगदीश कुमावत यांचा मुलगा अर्जुन याने काका असलेले कैलास कुमावत यांच्यावर चाकूने हल्ला केल्याने, ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.