टॅटू, छोटे कपडे आणि दारू पिण्याचा दबाव; वहिनीला 'विदेश' बनवण्यासाठी दीराने केलं हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 09:26 AM2023-04-11T09:26:38+5:302023-04-11T09:28:23+5:30

पीडितेने सांगितलं की, तिचं लग्न मुस्लिम रितीरिवाजानुसार झालं होतं. पण सासरचे लोक तिच्यावर विदेशी महिलांसारखं राहण्याचा दबाव टाकत होते.

Brother in law and husband arrested from Delhi for allegedly forcing women to live in European culture Bihar | टॅटू, छोटे कपडे आणि दारू पिण्याचा दबाव; वहिनीला 'विदेश' बनवण्यासाठी दीराने केलं हे काम

टॅटू, छोटे कपडे आणि दारू पिण्याचा दबाव; वहिनीला 'विदेश' बनवण्यासाठी दीराने केलं हे काम

googlenewsNext

बिहारच्या दरभंगामधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे सूनेला यूरोपियन कल्चरसारखं जगण्यासाठी भाग पाडण्यात आलं. पीडितेने पती अमीरूद्दीन आणि दीर ताहिर हुसैनविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

पीडितेने सांगितलं की, तिचं लग्न मुस्लिम रितीरिवाजानुसार झालं होतं. पण सासरचे लोक तिच्यावर विदेशी महिलांसारखं राहण्याचा दबाव टाकत होते. महिलेने सांगितलं की, दीर हाय प्रोफाइल राहण्याचं सांगून तिला छोटे-छोटे कपडे घालण्यास आणि दारू पिण्यासही सांगत होता. 

पीडितेने सांगितलं की, पती मित्रासोबत करत असलेल्या दारूच्या पार्ट्यांना चालण्यासाठी दाबव टाकत होता. इतकंच नाहीतर नकार दिल्यावर तिला मारहाण केली जात होती. एकदा तर आग लावून जीवे मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे ती 2021 मध्ये माहेरी परत आली होती.

महिलेने आधी दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली आणि नंतर दरभंगा इथे पती आणि दीराविरोधात तक्रार दाखल केली. इथे राहणाऱ्या रूकैयाचं लग्न दिल्लीच्या अमीरूद्दीनसोबत 2015 मध्ये झालं होतं. पण लग्नाच्या काही महिन्यांनंतर तरूणीवर यूरोपियन कल्चरच्या हिशेबाने राहण्याचा दबाव टाकण्यात आला. 

पीडित महिलेचा दीर दिल्लीमध्ये मोठा टॅटू डिझायनर आहे. ताहिर हुसैन याने त्याच्या प्रायव्हेट पार्टपासून ते पूर्ण शरीरावर टॅटू काढले आहेत. रूकैयाचे काका म्हणाले की, त्यांच्या पुतणीचं जीवन तिच्या सासरच्या लोकांनी नरक बनवलं आहे. ती बरेच वर्ष गप्प बसली. पण जेव्हा सगळं समोर आलं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला.

याबाबत पोलिसांनी सांगितलं की, महिलेने 2021 मध्ये तक्रार दाखल केली होती. पोलीस गंभीरतेने चौकशी करत आहेत. पीडितेचा पती आणि तिच्या दीराला अटक करून दरभंगाला आणण्यात आलं आहे. चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल.

Web Title: Brother in law and husband arrested from Delhi for allegedly forcing women to live in European culture Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.