संपत्तीसाठी भावजयीसह दोन मुलींना जिवंत जाळण्याचा दिराचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2022 08:37 AM2022-07-06T08:37:12+5:302022-07-06T08:37:26+5:30

आरडाओरड केल्याने ग्रामस्थ मदतीला धावले. प्रकृती गंभीर असल्याने मंगला परिहार व पूनम परिहार यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

brother in law attempt to burn alive two girls, including his brother-in-law, for wealth | संपत्तीसाठी भावजयीसह दोन मुलींना जिवंत जाळण्याचा दिराचा प्रयत्न

संपत्तीसाठी भावजयीसह दोन मुलींना जिवंत जाळण्याचा दिराचा प्रयत्न

Next

जाफराबाद (जि. जालना) : विधवा भावजयीच्या संपत्तीवर डोळा ठेवत  दिराने भावजयीसह दोन मुलींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार जाफराबाद तालुक्यातील  कोनड येथे ३ जुलै रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडला. यात तिघीही गंभीर जखमी असून, त्यांच्यावर औरंगाबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

येथील मंगला राजेंद्र परिहार (४८) यांच्याशी त्यांचा मोठा दीर समाधान रामसिंग परिहार याचे जमिनीवरून वाद होते. आठ दिवसांपूर्वीच पेरणीच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाले होते. तेव्हा समाधान परिहार याने मंगला परिहार यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. ३ जुलैच्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास घरात प्रचंड धूर झाला. लहान मुलगी ज्ञानेश्वरीने मोठ्या बहिणीला व आईला झोपेतून उठविले. त्यांनी घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केला असता, दरवाजा बाहेरून बंद होता. तिघी माय-लेकी कशाबशा घराबाहेर पडल्या. बाहेर दीर समाधान परिहार पाठीवर चार्जिंगचा पंप व हातात जळता टेंभा घेऊन उभा होता. त्याने पंपाच्या स्प्रेने मंगला परिहार व पूनमच्या अंगावर पेट्रोल टाकले. लहान मुलगी ज्ञानेश्वरी कशीबशी तिथून पळाली. 

आरडाओरड केल्याने ग्रामस्थ मदतीला धावले. प्रकृती गंभीर असल्याने मंगला परिहार व पूनम परिहार यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी जाफराबाद पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयित आरोपी समाधान परिहार याला ताब्यात घेतले आहे.

Web Title: brother in law attempt to burn alive two girls, including his brother-in-law, for wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.