“माझ्या बहिणीला पळवलं आता तुझ्या बहिणीसोबत माझं लग्न कर”; मेव्हुण्यानं दाजीची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 03:48 PM2022-02-08T15:48:57+5:302022-02-08T15:49:34+5:30

पती-पत्नी दोघंही ढाणी भागात राहायला होते. काही काळाने मेव्हुणा दाजींसोबत चांगले संबंध प्रस्थापित करु लागला.

Brother-in-law Killed brother-in-law with bullets, got married 5 months ago, family members were shocked | “माझ्या बहिणीला पळवलं आता तुझ्या बहिणीसोबत माझं लग्न कर”; मेव्हुण्यानं दाजीची केली हत्या

“माझ्या बहिणीला पळवलं आता तुझ्या बहिणीसोबत माझं लग्न कर”; मेव्हुण्यानं दाजीची केली हत्या

Next

बाडमेर – राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. याठिकाणी एका भावानं संतापाच्या भरात स्वत:च्या बहिणीला विधवा बनवलं आहे. सोमवारी रात्री कारमधून पिस्तुल घेऊन उतरलेल्या काही जणांनी युवकावर अंदाधुंद गोळीबार करुन त्याची हत्या केली. युवकाच्या छातीवर ३ गोळ्या लागल्या होत्या. सुरुवातीच्या तपासात मृत युवकाचं ५ महिन्यापूर्वी कोर्ट मॅरेज झाल्याचं उघड झालं.

पती-पत्नी दोघंही ढाणी भागात राहायला होते. काही काळाने मेव्हुणा दाजींसोबत चांगले संबंध प्रस्थापित करु लागला. मेव्हुण्याचे आधीच लग्न झालेले असताना त्याने दाजींच्या बहिणीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. पतीनं मेव्हण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यानंतर मेव्हण्याने त्याचा काटा काढला. सध्या या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पतीनं जीव वाचवण्याचा केला प्रयत्न

पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ७ च्या सुमारास बावडी रहिवासी महेंद्र खानचे पुत्र मीर खान गल्लीतून काही कामानिमत्त आले होते. कारमधून खाली उतरताच तो मित्राच्या दुकानाकडे गेला. त्यावेळी आधीच वाट पाहत बसलेले अली खान खुडाणीने पाठिमागून जात त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. युवकाने स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु हल्लेखोराने पाठलाग करुन त्याला ठार केले. याचवेळी परिसरातील लोकांनी हल्लेखोराला पकडलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. लोकांनी आरोपीला त्यांच्या ताब्यात दिले. तर परिसरातील लोकांनी गंभीर अवस्थेत युवकाला बाडमेरला पाठवलं. जिल्हा हॉस्पिटलमध्ये पोहचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

५ महिन्यापूर्वी झालं होतं लग्न

मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्रनं ५ महिन्यापूर्वी खुडाणी गावातील युवतीसोबत पळून जात लग्न केले होते. लग्नानंतर युवतीचा भाऊ महेंद्रसोबत त्याच्या बहिणीशी लग्न करण्यासाठी मागे लागला होता. महेंद्र आणि युवतीनं कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर पंचायतीने युवकाला दंड लावत लग्नाला मान्यता दिली. जेव्हा महेंद्रनं त्याच्या बहिणीचं लग्न अली खानसोबत करण्यास नकार दिला तेव्हा तो नाराज झाला. त्यामुळेच त्याने गोळीबार करुन महेंद्रची हत्या केली.

Web Title: Brother-in-law Killed brother-in-law with bullets, got married 5 months ago, family members were shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.