बहिणीला बाजूला करत प्रेमात पडले भावोजी आणि मेहुणी, मग उचललं हे धक्कादायक पाउल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 01:32 PM2021-09-04T13:32:59+5:302021-09-04T13:34:20+5:30

लोकांना बरेलीच्या भोजीपुरा भागात भावोजी आणि मेहुणी एकत्र बेशुद्ध आढळून आले होते. तपासातून समोर आलं की, दोघांनी कथितपणे विष प्यायलं होतं.

Brother in law and sister in law ends life after love crime Bareilly UP | बहिणीला बाजूला करत प्रेमात पडले भावोजी आणि मेहुणी, मग उचललं हे धक्कादायक पाउल

बहिणीला बाजूला करत प्रेमात पडले भावोजी आणि मेहुणी, मग उचललं हे धक्कादायक पाउल

googlenewsNext

उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक मेहुणी आणि भावोजी रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र डॉक्टर त्यांचा जीव वाचवू शकले नाहीत. 

लोकांना बरेलीच्या भोजीपुरा भागात भावोजी आणि मेहुणी एकत्र बेशुद्ध आढळून आले होते. तपासातून समोर आलं की, दोघांनी कथितपणे विष प्यायलं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना जिल्हा रूग्णालयात घेऊन गेले. पण दोघांचाही मृत्यू झाला होता. पुरूषाचं वय २६ तर तरूणीचं वय २२ वर्षे आहे. (हे पण वाचा : टॅटूवरून पटली मृताची ओळख; आरोपी ४८ तासात उल्हासनगर येथून गजाआड)

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मृतक जवळच्याच पीलीभीत जिल्ह्यातील पाहणारा होता आणि त्याच्यासोबत असलेली महिला त्याच्या पत्नीची लहान बहीण होती. चौकशीतून समोर आलं की, या व्यक्तीचं त्याच्या मेहुणीसोबत अफेअर होतं. दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं. पण त्यांच्या परिवाराचा या नात्याला विरोध होता. त्यानंतर भावोजी आणि मेहुणी घरातून पळून गेले आणि त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

पोलीस अधिकारी राजकुमार अग्रवाल म्हणाले की, ११२ वर मिळालेल्या माहितीनुसार, एक कपल सेंथल रोडवर बेशुद्ध पडलं होतं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांनाही रूग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांचा मृत्यू झाला. ते पुढे म्हणाले की, भावोजी आणि मेहुणीच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं. त्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या परिवारांकडे सोपवण्यात आले.
 

Web Title: Brother in law and sister in law ends life after love crime Bareilly UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.