लव्ह मॅरेजला विरोध असणाऱ्या भावाने बहिणीचे कपाळ केले पांढरे, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 06:05 PM2022-01-10T18:05:17+5:302022-01-10T18:05:49+5:30

Murder Case : प्रथमदर्शनी या हत्येचे कारण प्रेमविवाह असल्याचे मानले जात आहे. मृत मनीषचे सिवानी येथील पूजा मेघवाल या तरुणीसोबत प्रेमविवाह झाला होता.

Brother in law killed own jija against love marriage found dead body | लव्ह मॅरेजला विरोध असणाऱ्या भावाने बहिणीचे कपाळ केले पांढरे, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

लव्ह मॅरेजला विरोध असणाऱ्या भावाने बहिणीचे कपाळ केले पांढरे, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

Next

चुरू - राजस्थानमधील चुरू येथील सादुलपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पहाडसर गावात ९ जानेवारी रोजी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला, त्या मृतदेहाची ओळख सोशल मीडियाच्या मदतीने पटवण्यात आली आहे. हरियाणातील लुहारू (भिवानी) पोलीस स्टेशन हद्दीतील सिंघानी गावातील 27 वर्षीय मनीष कुमार ब्राह्मण याचा मृतदेह होता.

प्रथमदर्शनी या हत्येचे कारण प्रेमविवाह असल्याचे मानले जात आहे. मृत मनीषचे सिवानी येथील पूजा मेघवाल या तरुणीसोबत प्रेमविवाह झाला होता. तेव्हापासून पूजाचा भाऊ विकास कुमार मनीषला जीवे मारण्याची धमकी देत ​​होता. मनीषच्या कुटुंबीयांनीही ही हत्या सिवानी येथील रहिवासी असलेल्या मनीषचा मेहुणा विकास कुमार याने केली असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

याप्रकरणी  सिंघानी येथील जय भगवान ब्राह्मण यांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ हेमकरण याचा मुलगा मनीष उर्फ ​​मुनेश हा काही महिन्यांपासून दिल्लीत ट्रान्सपोर्टमध्ये कामाला होता. नववर्षानिमित्त तो गावी आला होता आणि 8 जानेवारीला मनीषने त्याच्या साथीदारांसह त्याचा मेहुणा विकास याला भेटण्यासाठी कारने  सिवानीला जातो असं सांगितले होते. आज माझा पुतण्या मनीषचा मृतदेह रक्त्याच्या थारोळ्यात पडलेला आढळला.

Web Title: Brother in law killed own jija against love marriage found dead body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.